Video : लहानगी अन् तिच्या डॉगीचे एकमेकांच्या सुरात-सूर, व्हीडिओ पाहून म्हणाल, “आयुष्य असंच सुरेल असावं…”

सध्या सोशल मीडियावर एक लहान मुलगी तिच्या लाडक्या कुत्र्यासोबत गाणं म्हणताना दिसत आहे. पांढरा टी-शर्ट आणि गुलाबी चमकदार स्कर्ट घातलेली एक लहान मुलगी गाणं म्हणताना दिसत आहे.

Video : लहानगी अन् तिच्या डॉगीचे एकमेकांच्या सुरात-सूर, व्हीडिओ पाहून म्हणाल, आयुष्य असंच सुरेल असावं...
| Updated on: Apr 28, 2022 | 6:13 PM

मुंबई : घरातील पाळीव प्राणी (Pets) आणि लहान मुलांमध्ये एक वेगळंच नातं असतं. त्यांच्यामध्ये नेगळ्या प्रकारचा जिव्हाळा असतो. या प्राण्यांवर चिमुकल्यांचा जीव असतो. त्यांच्या शिवाय या चिमुरड्यांना राहावत नाही. सध्या असाच एका लहान मुलीचा (A little girl) आणि तिच्या घरातील कुत्र्याचा जिव्हाळा सांगणारा एक व्हीडिओ सध्या व्हायरल  (Viral Video) होत आहे. यात ही लहान मुलगी तिच्या आवडत्या कुत्र्यासोबत गाणं गाताना दिसत आहे. तिचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक लहान मुलगी तिच्या लाडक्या कुत्र्यासोबत गाणं म्हणताना दिसत आहे. पांढरा टी-शर्ट आणि गुलाबी चमकदार स्कर्ट घातलेली एक लहान मुलगी गाणं म्हणताना दिसत आहे. यात तिचा सोबत तिचा लाडका कुत्रा दिसतोय. हे दोघे गाणं म्हणण्यात रमलेले दिसत आहेत.

हा व्हीडिओ बार्कड नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. याला ‘हे दोघं किती चांगलं गात आहेत. तुम्हाला जर यांच्या सारखं लोकांपर्यंत पोहोचालयचं असेल तर आमच्या बार्क क्लबला डॉईन करा, असं या कॅप्शनमध्ये म्हणण्यात आलं आहे. यााल एक लाखाहून अधिकांनी लाईक केलंय तर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहिलंय की ‘हा व्हिडिओ किती सुंदर आहे. मी तर या दोघांच्या प्रेमात पडलोय.’ तर दुसरा म्हणतो, ‘हे दोघे एवढं चांगलं गात आहेत की मी या कॉन्सर्टचं तिकिट खरेदी करूनही ही गाणी ऐकू शकतो.’  तिसऱ्याने “असंच सुरेल आयुष्य असावं…”, असं म्हटलंय.

सध्या एका चिमुकलीचा आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक कुत्रा या लहान मुलीची मदत करतोय. तिचं गायीच्या हल्ल्यापासून संरक्षण करतोय. या व्हीडिओत लहान एक लहान मुलगी दिसतेय. तिच्याभोवती गायींचा गराडा पाहायला मिळतोय. या गायी तिच्यावर हल्ला चढवतात. पण इतक्यात तिचा सच्चा यार कुत्रा तिची मदत करतोय. तिचं या गायींपासून संरक्षण करतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.