Video : नारळामधून पाणी काढा केवळ दोन सेकंदात!, कसं? पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 17, 2022 | 11:43 AM

नारळ फोडायची आणि त्यातून पाणी काढायची सोपी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओतील पद्धतीनुसार जर तुम्ही नारळ फोडला तर अवघ्या दोन सेकंदात तुम्ही नारळ फोडून पाणी काढू शकता.

Video : नारळामधून पाणी काढा केवळ दोन सेकंदात!, कसं? पाहा व्हीडिओ...
व्हायरल व्हीडिओ
Follow us on

मुंबई : भारतीय लोक कोणतही कठीण काम सोप्या पद्धतीने करण्यात माहिर आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या ‘जुगाड’ चा वापर करतात. आता नारळासारखं (Coconut) कठीण फळ फोडायचं म्हणजे जीव कंठाशी येतो. पण हा नारळ फोडायची आणि त्यातून पाणी काढायची सोपी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video)होत आहे. या व्हीडिओतील पद्धतीनुसार जर तुम्ही नारळ फोडला तर अवघ्या दोन सेकंदात तुम्ही नारळ फोडून पाणी काढू शकता. या व्हीडिओतील व्यक्ती एका मशीनच्या साहाय्याने नारळ फोडते. ओला नारळ ही व्यक्ती जोरात त्या मशीनवर आदळते. पुढच्या क्षणात त्या नारळातून पाणी निघतं.

व्हायरल व्हीडिओ

नारळ फोडायची आणि त्यातून पाणी काढायची सोपी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओतील पद्धतीनुसार जर तुम्ही नारळ फोडला तर अवघ्या दोन सेकंदात तुम्ही नारळ फोडून पाणी काढू शकता. या व्हीडिओतील व्यक्ती एका मशीनच्या साहाय्याने नारळ फोडते. ओला नारळ ही व्यक्ती जोरात त्या मशीनवर आदळते. पुढच्या क्षणात त्या नारळातून पाणी निघतं.

हा देसी जुगाड व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती केवळ 2 सेकंदात देसी जुगाडातून नारळाचे पाणी काढत आहे. Techzexpress या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर 36 हजारांहू अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. तर अनेकांनी कमेंट करत हा जुगाड आवडल्याचं म्हटलंय.

नारळ पाणी पिल्याने शरिरावर चांगले परिणाम होतात. नारळ पाण्यामुळे शरीराला ‘हायड्रेट’ ठेवता येते. यामुळे किडनी स्टोनच्या आजारापासून दूर राहू शकता. शरीरातील पाण्याचे संतुलित प्रमाण राखण्यासाठी नारळ पाणी एक चांगला स्रोत आहे. नारळाचे पाणी कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करून हृदयविकारापासून वाचवते. नारळ पाण्यात पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. ते रक्तदाब कमी करण्यासही मदत करते. नारळाचे पाणी अँटिऑक्सिडंट ने भरपूर असते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते.

संबंधित बातम्या

Video : चालत्या गाडीवरून उडी मारणारा हाच तो स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तिमान!, काही सेकंदाचा व्हीडिओ तुम्हाला वेड लावेल…

Video : भररस्त्यात पोरीनं डिलिव्हरी बॉयला पायतानानं तुडवलं!, अहो, कारण तर वाचा की महाराज…

Video : कच्चा बदामवर ‘काकूबाईं’चा डान्स, पाहून हसू आवरणार नाही, नेटकरी म्हणतात, “बेस्ट डान्स!”