
आपला छंद पूर्ण करण्यासाठी शरीर साथ देत नाही, वय झालंय असं अनेकांना वाटतं. पण म्हणतात ना, हौशेला मोल आणि वयही नसतं. जिद्द असेल तर कुठल्याही वयात सुरुवात करता येते. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आजीबाई भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. अनेकांनी 63 वर्षांच्या रवि बाला शर्मा उर्फ डान्सिंग दादीकडून प्रेरणा घेतली पाहिजे, ज्या अजूनही त्यांचे स्वप्ने सत्यात उतरवत आहेत. सोशल मीडियावर सध्या लोकांना ‘डान्सिंग दादी’ खूप व्हायरल होत आहेत. नव्या-जुन्या गाण्यांवर डान्सर दादीच्या दमदार नृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच या आजीही सोशल स्टार झाल्या आहेत. नुकतंच त्यांनी सारा अली खानच्या चका चक या गाण्यावर डान्स केला आहे. (Viral Video of 63 yr old desi dadi nails Sara Ali Khan Chaka Chak dance )
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये जन्मलेला रवी बाला सध्या मुंबईत आपल्या मुलासोबत राहतात. त्यांनी एका सरकारी शाळेत संगीत शिक्षिका म्हणून काम केलं आहे. लहानपणी त्यांनी वडील शांती स्वरूप शर्मा यांच्याकडून कथ्थक, गाणं आणि तबला वाजवणं शिकलं. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आजी हिरव्या रंगाच्या सुंदर साडीत सारा अली खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्या हुबेहुब गाण्यातील सारा अली खान सारख्याच दिसत आहेत. या गाण्याची हुक स्टेप त्या अगदी हुबेहुब करतात. शिवाय, चेहऱ्यावरील हावभाव तर विचारायलाच नको.
व्हिडीओ पाहा:
त्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर 3 लाखांच्या व्हूव्हज आकडा पार केला आहे. रवी बाला शर्मा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रवी बाला शर्मा या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. त्यांना सध्या 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. दररोज, त्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवीन जुन्या गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर करताच, जे लोकांना खूप आवडतात.
एक अष्टपैलू नृत्यांगना असल्यामुळे तुम्ही त्यांना लोकगीतं, बॉलीवूड नंबर तसंच भांगडा करतानाही पाहू शकता. बॉलीवूडच्या अनेकांना या आजींनी इम्प्रेस केलं आहे, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ, इम्तियाज अली आणि टेरेन्स लुईस यांचाही समावेश आहे.
हेही पाहा: