VIDEO | लॉकडाऊनमध्ये फिरताना पोलिसांनी हटकलं, पठ्ठ्या म्हणतो, माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय

| Updated on: Jun 03, 2021 | 1:39 PM

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरण्यावरुन टोकत पोलिसांनी एका व्यक्तीला अडवले. त्याने सांगितले कारण ऐकून पोलिसांनाही हसू आवरेना. (Karnataka Man Hen Stomach Ache)

VIDEO | लॉकडाऊनमध्ये फिरताना पोलिसांनी हटकलं, पठ्ठ्या म्हणतो, माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय
कोंबडीला डॉक्टरकडे नेण्याची खोटी सबब
Follow us on

बंगळुरु : लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडण्यासाठी अनेक जण वेगवेगळी कारणं शोधताना दिसतात. कोणी दूध-भाजीपाला आणायला जात असल्याचं सांगतं, तर कोणी अत्यावश्यक सेवेत असल्याचं म्हणतं. खोटी कारणं देऊन फिरणाऱ्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याचं उत्तर ऐकून तुम्हीही खो-खो हसाल (Viral Video of Karnataka Man says his Hen has Stomach Ache)

नेमकं काय घडलं?

कर्नाटकमधील गडग जिल्ह्यात घडलेल्या या गंमतीशीर प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरण्यावरुन टोकत पोलिसांनी एका व्यक्तीला अडवले. त्याने सांगितले कारण ऐकून पोलिसांनाही हसू आवरेना. या माणसाने दिलेली सबब कोणाकडून पडताळून घ्यावी, असा प्रश्नच पोलिसांना पडला.

कोंबडीच्या पोटात दुखतंय, डॉक्टरकडे नेतोय

माझ्या कोंबडीच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन चाललो आहे, असं भन्नाट उत्तर या व्यक्तीने दिलं. पोलिसांना खरं तर त्याला कठोर शिक्षा द्यायची होती. अगदी त्याला कोंबडा बनवण्याचीही इच्छा झाली असावी, मात्र त्याचं कोंबडी पुराण ऐकून पोलिसांची हसता पुरेवाट झाली. अखेर, या कोंबडीवर घरातच उपचार कर असं सांगून पोलिसांनी त्याला पुन्हा घरी पिटाळलं

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला ‘असा’ इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पोपटाने गिटारच्या धूनवर गायलं भन्नाट गाणं, नेटकरी हैराण, लाखों युजर्सनी पाहिला Video

(Viral Video of Karnataka Man says his Hen has Stomach Ache)