रस्ता की मृत्यूचं जाळं? एका सेकंदात रस्त्याने माणसाला गिळलं, थरारक व्हिडीओ समोर

South Korea Viral Video: मन सुन्न करणारा व्हिडीओ..., 'त्या' रस्त्यावर लिहिला होता दुचाकीस्वाराचा मृत्यू, रस्ता की मृत्यूचं जाळं?, रस्त्याने माणसाला गिळलं... थरारक व्हिडीओ पाहून म्हणाल..., सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

रस्ता की मृत्यूचं जाळं? एका सेकंदात रस्त्याने माणसाला गिळलं, थरारक व्हिडीओ समोर
स्क्रिनशॉट
| Updated on: Apr 14, 2025 | 12:08 PM

South Korea Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील सोशल मीडियावर एका थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ दुचाकीस्वार बाईक चालवत असताना अचानक पडलेल्या खड्ड्यात पडतो आणि दुचाकास्वाराचा मृत्यू होतो. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ दक्षिण कोरियाचा असल्याची माहिती देखील समोर येत आहे. पूर्ण घटमा सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कसा झाला अपघात?

ही घटना सोलच्या गँगडोंग वॉर्डमध्ये घडली. रस्त्यावरून कार आणि बाईक सामान्यपणे धावत होत्या, पण रस्त्यात अचानक एक मोठा खड्डा पडला आणि दुचाकीस्वार त्यात पडला. अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक कार देखील त्या दिशेने जात होती. पण कार चालकाचं नशीब चांगलं होतं म्हणून तो थोडक्यात बचावला. पण त्या कार पाठोपाठ आलेल्या दुचाकीस्वारीसाठी तो रस्ता मृत्यूचं जाळ बनला… एकाएकी दुचाकीस्वाराला त्या रस्त्याने गिळलं.

 

 

अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव पार्क असं आहे. तर वयाच्या 30 व्या वर्षी व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला. मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यास जास्त वेळ लागला नाही, पण तोपर्यंत पार्क गायब झाला.

18 तासांनंतर मिळाला मृतदेह

कोरिया टाइम्सनुसार, बचाव पथकाने रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवली. पहाटे 1.37 वाजता एक मोबाईल फोन सापडला, जो कदाचित पार्कचा असावा. सुमारे दोन तासांनंतर, त्याची मोटारसायकल खड्ड्यापासून 30 मीटर अंतरावर सापडली. पण पार्कचा शोध लागला नाही. तब्बल 18 तास शोधकार्य केल्यानंतर पार्कचा मृतदेह सापडला. या अपघाताने सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सांगायचं झालं तर, अचानक रस्ता कोसळण्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक प्रशासन याचा संबंध जवळच्या मेट्रो बांधकामाशी जोडत आहे. रस्त्याच्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता आहे.

या अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीदायक वातावरण आहे. घडलेल्या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने जवळच्या चार शाळा बंद केल्या आहेत आणि पुढील दुर्घटना टाळण्यासाठी पाणी आणि गॅसचा पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे.