
विदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय तरुणांसाठी अमेरिका एक मोठं आकर्षण आहे. पण इथे शिक्षण घेणं आणि तिथे राहणं तितकंच महाग आहे. त्यामुळे भारतासह इतर देशांतील अनेक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतानाच पार्ट टाइम नोकऱ्या करतात, जेणेकरून त्यांचे वैयक्तिक खर्च भागवता येतील. अमेरिकेतील नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आठवड्यात फक्त 20 तास पार्ट टाइम नोकरी करण्याची परवानगी आहे. पण जर योग्य स्किल्स असतील, तर हे 20 तासही तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.
अमेरिकेत अशा काही पार्ट टाइम नोकऱ्या आहेत, ज्या केवळ एक तासातच तुम्हाला ₹25,000 पर्यंत कमाई करून देऊ शकतात. यामध्ये विशेष कौशल्यांची गरज असते, पण एकदा का ते स्किल्स शिकले की, कमाईची मर्यादा राहत नाही.
1. रिअल इस्टेट एजंट
भारतात जिथे ही नोकरी पूर्णवेळ केली जाते, तिथे अमेरिकेत ती पार्ट टाइम करता येते. जर तुम्हाला नेटवर्किंग, सेल्स किंवा कम्युनिकेशन यासारख्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, तर रिअल इस्टेट एजंट म्हणून पार्ट टाइम काम करताही भरपूर पैसे मिळवू शकता. महिन्याला फक्त एक प्रॉपर्टी विकली, तरी तुमचं संपूर्ण महिन्याचं बजेट सहज सुटू शकतं.
2. फ्रीलान्स सॉफ्टवेअर डेव्हलपर
आजच्या डिजिटल युगात फ्रीलान्सिंगचं महत्व झपाट्याने वाढतंय. वेब डेव्हलपमेंट, क्लाउड मॅनेजमेंट किंवा बॅकएंड कोडिंगसारख्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेत अनेक कंपन्या पार्ट टाइम सॉफ्टवेअर डेव्हलपर्स शोधतात. जर तुम्ही अनुभवी आणि कौशल्यसंपन्न असाल, तर तुम्ही एका तासासाठी $75 ते $150 म्हणजेच ₹6,500 ते ₹13,000 पर्यंत कमवू शकता.
3. फोटोग्राफर
जर तुमच्यात क्रिएटिविटी आहे, कॅमेरा आणि लाइटिंगचं ज्ञान आहे, तर प्रोफेशनल फोटोग्राफर बनणं हा उत्तम पर्याय आहे. अमेरिकेत बेबी शूटींगपासून ते वेडिंग आणि बर्थडे इव्हेंट्ससाठी फोटोग्राफर्सची मोठी मागणी असते. एक इव्हेंट शूट केल्यावर फोटोग्राफरला $2,000 ते $5,000 (₹1.7 लाख ते ₹4.2 लाख) सहज मिळतात. कामाचे तास तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता.
4. ऑनलाइन कन्सल्टंट
फायनान्स, मार्केटिंग, एज्युकेशन अशा क्षेत्रांमध्ये ऑनलाइन कन्सल्टिंगची जबरदस्त मागणी आहे. जर तुमच्याकडे आधीपासून अनुभव आहे आणि तुम्ही अमेरिकेतील मास्टर्स कोर्समध्ये शिकत असाल, तर हे एक उत्तम कमाईचं साधन आहे. एक तासात तुम्हाला $100 ते $300 म्हणजेच ₹8,500 ते ₹25,000 पर्यंत मिळू शकतात.
5. हिंदी किंवा स्थानिक भाषांचे शिक्षक
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबांना त्यांची संस्कृती पुढच्या पिढीत पोहोचवायची असते. त्यामुळे अनेक पालक त्यांच्या मुलांसाठी हिंदी, गुजराती, मराठी, तामिळ, कन्नड भाषांचे ट्यूटर शोधतात. जर तुमचं भाषेवर प्रभुत्व आहे, तर तुम्ही सहजपणे घरी बसून शिकवू शकता आणि चांगली कमाई करू शकता.
अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पार्ट टाइम जॉब्स केवळ पैशांचा पर्याय नाही, तर ते एक मोठं कौशल्यविकासाचं साधन आहे. योग्य स्किल्स आणि प्लॅनिंगने तुम्ही तुमचे खर्चच नव्हे, तर भविष्यासाठी बचतसुद्धा करू शकता. एक तासात ₹25,000 कमावण्याचं स्वप्न आता फक्त स्वप्न उरलेलं नाही ते वास्तवातही बदलू शकतं!