जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, 13.3 लाख कोटीची संपत्ती, पण 48 वर्ष पाणीच प्यायला नाही, तरीही जिवंत कसा?

वॉरेन बफेट, जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक, त्यांची 13.3 लाख कोटींची संपत्ती आणि असामान्य सवयीसाठी ओळखले जातात. धक्कादायक म्हणजे, ते गेल्या 48 वर्षांपासून पाण्याचा एकही थेंब प्यायले नाहीत! याऐवजी ते दिवसातून 5 कॅन कोका-कोला पितात. त्यांच्या या अजब आहाराचे रहस्य आणि कोका-कोलाशी असलेले त्यांचे अनोखे नाते जाणून घ्या.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, 13.3 लाख कोटीची संपत्ती, पण 48 वर्ष पाणीच प्यायला नाही, तरीही जिवंत कसा?
Warren Buffett
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 11:22 PM

वॉरेन बफेट हे नाव माहीत नाही, असा माणूसच विरळा असेल. जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार, अब्जाधीश व्यक्ती म्हणून वॉरेन बफेट (Warren Buffett) हे प्रसिद्ध आहेत. 95 वर्षाचे वॉरेन बफेट हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणुकदार म्हणून ओळखले जातात. ‘ओरेकल ऑफ ओमाहा’ म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. त्यांच्याकडे 13.3 लाख कोटींची संपत्ती आहे. प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट कंपनी बर्कशायर हैथवे (Berkshire Hathaway) चे ते मालक आहेत. त्यांच्या श्रीमंतीची जगात चर्चा होत असते. पण त्यांची एक सवय फार कमी लोकांना माहीत आहे. ही सवय थोडी हटके आहे. ते म्हणजे गेल्या 48 वर्षात ते साधं पाणी प्यायले नाहीत. तरीही ते जिवंत आहेत. कसे?

गेल्या 48 वर्षात वॉरेन बफेट यांनी पाण्याच्या थेंबालाही हात लावला नाही. पाण्याच्या ऐवजी ते कोका कोला पितात. ड्रिंकची त्यांना प्रचंड सवय आहे. त्यामुळेच त्यांनी पाणी वर्ज्य केलं आहे. हेज फंड मॅनेजर बिल एकमॅन (Bill Ackman) यांनी एका पॉडकास्टमध्ये बफेट यांच्या या सवयीचा खुलासा केला आहे. एकदा मी बफेट यांना माझ्या घरी जेवणासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी त्यांना साधं पाणी आणि सोडा वॉटर ऑफर केलं. पण बफेट यांनी दोन्ही घेण्यास नकार दिला. त्यावर विचारलं असता बफेट म्हणाले, बिल, मी गेल्या 48 वर्षात पाणी प्यायलो नाही. त्यांचं हे उत्तर ऐकून मला धक्काच बसला, असं एकमॅन यांनी सांगितलं. केवळ एकमॅनच नाही तर बफेट यांची मुलगी सूजी बफेट यांनीही एका डॉक्युमेंट्रीत त्यांच्या या सवयीचा खुलासा केला होता.

Loading...

कोका कोलाच्या पाच कॅन

बफेट पाणीच पीत नाही तर मग ते तहान कशी भागवतात? असा सवाल आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांना कोका कोला पिणं आवडतं. बफेट रोज 5 कॅन कोका कोला पितात. खासकरून त्यांना चेरी फार आवडते. आपल्या या सवयीवर ते जोकही करत असतात. माझ्या शरीराचा एक चतुर्थांश भाग कोका कोला झाला आहे, असं बफेट म्हणतात. रोज सुमारे 2700 कॅलरींपैकी 25 टक्के कॅलरीज त्यांना ड्रिंकमधून मिळतात. अर्थात बफेट यांच्या वैयक्तिक आहाराचा हा भाग आहे. सर्वांनी त्यांच्या सारखं करणं घातक ठरू शकतं. शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे संतुलित पोषण मिळतं.

आधी पेप्सी प्यायचे

कोका कोलापूर्वी बफेट हे पेप्सी प्यायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे. 1980च्या दशकापूर्वी ते पेप्सी घ्यायचे. त्यांच्या या सवयीमुळे त्यांचा मुलगा त्यांना ‘पेप्सी वॉरेन’ म्हणून हाक मारायचा. पण 1985 नंतर त्यांची सवय बदलली. त्यांचे शेजारी कोका कोला कंपनीत उच्च पदावर होते. त्यांनी बफेट यांना चेरी कोकचं एक सँपल पाठवलं. बफेट यांना त्याची चव आवडली. तेव्हापासून ते कोका कोलाचे नियमित ग्राहक बनले आहेत. इतकंच नाही तर 1986 रोजी त्यांनी चेरी कोकला आपली कंपनी बर्कशायर हॅथवेच्या बैठकीतील अधिकृत पेय म्हणून घोषित केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us