चुलतीला, मेव्हणीला ही गोष्ट आताच सांगून ठेवा, ट्रेनमध्ये 20 रुपयांची बिसलरी आता… पुन्हा म्हणश्याल सांगितलं नाय म्हणून.. किमत काय?

ट्रेनमध्ये रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील माहिती नाही हा रेल्वेचा पाण्याच्या बाटलीबाबतचा नियम. आताच जाणून घ्या नाही तर होईल पश्चाताप.

चुलतीला, मेव्हणीला ही गोष्ट आताच सांगून ठेवा, ट्रेनमध्ये 20 रुपयांची बिसलरी आता... पुन्हा म्हणश्याल सांगितलं नाय म्हणून.. किमत काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 20, 2026 | 6:43 PM

Water Bottle rules in Train: रेल्वे स्टेशन आणि लांबच्या प्रवासी गाड्यांमध्ये अनेकदा ‘रेल नीर’ या ब्रँडचे पाणीच विकले जाते. पूर्वी 15 रुपयांना मिळणारी ही पाण्याची बाटली आता 14 रुपयांना मिळणार आहे. मात्र अनेक प्रवासी ट्रेनमध्ये बिसलेरी, किन्नले अशा वेगवेगळ्या ब्रँड असणाऱ्या कंपनीचे पाणी घेतात. त्याची किंमत 20 रुपये असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ट्रेनमध्ये रेल नीरशिवाय दुसऱ्या कंपनीचे पाणी घेतले तरी त्यासाठी जास्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत?

रेल्वेच्या नियमांनुसार ट्रेनमध्ये विकले जाणारे कोणतेही पाणी ते रेल नीर असो किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त कंपनीचे रेल नीरच्या किमतीतच म्हणजे 14 रुपयांमध्येच विकले जाणे बंधनकारक आहे.

ट्रेनमध्ये रेल नीरऐवजी दुसऱ्या कंपनीचे पाणी विकता येते का?

अनेकांना ट्रेनमध्ये रेल नीरऐवजी दुसऱ्या कंपनीचे पाणी विकता येते का असा प्रश्न पडतो. तर याचे उत्तर आहे होय, पण त्यासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या ट्रेनमध्ये रेल नीर उपलब्ध नसेल तर IRCTCचे अधिकृत वेंडर रेल्वेने मान्य केलेल्या दुसऱ्या कंपनीचे पाणी विकू शकतात. मात्र, वेंडर मनमानी पद्धतीने कोणत्याही कंपनीचे पाणी विकू शकत नाहीत. रेल्वेने प्रत्येक झोननुसार काही ठराविक कंपन्यांनाच परवानगी दिलेली आहे. त्या झोनमध्ये फक्त त्याच कंपन्यांचे पाणी विकले जाऊ शकते.

कोणत्या झोनमध्ये कोणते पाणी?

ईस्टर्न रेल्वे झोनमध्ये Bailley, Amust, Aqua Diamond, Bizaree, Bisleri, Jalsutra, Prixpert यांसारख्या कंपन्यांचे पाणी विकण्याची परवानगी आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे झोनमध्ये Bisleri, Aquafina, Bailley आणि Kinley या कंपन्यांचे पाणी विकले जाऊ शकते. म्हणजेच, प्रत्येक रेल्वे झोनसाठी पाण्याच्या कंपन्या आधीच ठरवण्यात आल्या आहेत आणि त्याच नियमांचे पालन करणे वेंडरसाठी बंधनकारक आहे.

जास्त पैसे घेतले तर काय करावे?

अनेक वेळा असे दिसून येते की, काही वेंडर रेल नीरसाठीही 14 रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतात किंवा इतर ब्रँडच्या पाण्यासाठी 20 रुपये किंवा त्याहून अधिक दर आकारतात. अशा वेळी प्रवाशांनी गप्प बसण्याची गरज नाही. तुम्ही तत्काळ तक्रार करू शकता. रेल्वे हेल्पलाईन नंबर 139 वर कॉल करून तुम्ही ही तक्रार नोंदवू शकता. तक्रार मिळताच संबंधित वेंडरवर त्वरित कारवाई केली जाते. काही प्रकरणांमध्ये तर संबंधित कंपनीवर किंवा वेंडरवर 25 हजार रुपयांपर्यंत दंड लावण्यात येतो.