LPG Cylinder: ‘ओला कपडा’ सांगेल किती उरलाय गॅस! सिलेंडरमध्ये LPG चेक करण्याचा देशी जुगाड Viral, 2 कोटी लोकांनी पाहिला Video

इंस्टाग्रामवर @salve_6717 या हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात एक देशी जुगाड दाखवण्यात आला आहे. एका ओल्या कपड्याच्या मदतीने सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे माहिती होतं, असा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर 2 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

LPG Cylinder: ओला कपडा सांगेल किती उरलाय गॅस! सिलेंडरमध्ये LPG चेक करण्याचा देशी जुगाड Viral, 2 कोटी लोकांनी पाहिला Video
एलपीजी गॅस सिलेंडर ट्रिक
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 17, 2026 | 1:41 PM

How To Check LPG level In Cylinder: इंटरनेटवर सध्या घरगुती गॅसवर मात करण्याचे, गॅस बचतीचे आणि किचनमधील ऊर्जा पर्यायाचे व्हिडिओ धुमाकूळ घालत आहेत. पण तरीही गॅस संपून मोठे संकट कोसळण्याची भीती गृहिणींना सतावत आहे. याच दरम्यान एक भन्नाट ट्रिक व्हायरल झाली आहे. त्याआधारे सिलेंडरमध्ये (Gas Cylinder) किती गॅस वाचला आहे, याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा देशी जुगाड (Desi Jugaad) आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

इंस्टाग्रामवर @salve_6717 या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात दाखवल्यानुसार, एक ओला कपडा हवा. त्याआधारे तुमच्या LPG सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे समोर येते. व्हिडिओनुसार, सर्वात अगोदर ओल्या कपड्यांच्या आधारे सिलेंडर चांगल्या प्रकारे पुसून घ्या. आता 2 मिनिटे वाट पाहा. सिलेंडरच्या ज्या भागात गॅस नाही, तो भाग लवकर संपेल तर जिथे गॅस आहे, तिथंपर्यंतचा ओलावा कायम असेल. म्हणजे गॅस टाकीत जितका गॅस आहे. तिथपर्यंतचा ओलावा टिकून राहिल. तर गॅस नसलेला पट्टा हा लवकर सुकेल. हा व्हिडिओ इंटरनेटवर हिट ठरला आहे. या देशी जुगाडाची एकच चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

युझर्सच्या गंमतीशीर कमेंट्स

हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर नेटिजनने त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. युजर्सने गंमतीसीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, एलपीजी किती उरलाय हे तर कळणार नाही, पण सिलेंडर मात्र ओल्या कपड्याने पुसल्याने स्वच्छ होईल. दुसर्‍याने सांगितले की, माझी आई तर सिलेंडर उचलून सांगते की गॅस अजून किती दिवस उरला आहे. तर एकाने जोरदार फिरकी घेतली. मी दिवसभर ओल्या कपड्याने गॅस टाकी पुसली. पण काहीच हाती लागले नाही. तज्ज्ञांच्या मते, ही काही प्रमाणित, वैज्ञानिक पद्धत नाही. सिलेंडवर घरातील आणि बाहेरील वातावरणाचा पण परिणाम होतो. त्यामुळे या पद्धतीवर आपण पूर्णपणे विश्वास करू शकत नाही. गॅस किती उरला हे तपासण्यासाठी इतरही अनेक पद्धती सांगण्यात येतात.

Disclaimer: ही बातमी व्हायरल सोशल मीडिया पोस्ट आणि नेटिजन्स यांच्या प्रतिक्रियावर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी या व्हिडिओत करण्यात आलेल्या कोणत्याही दाव्याची पुष्टि करत नाही.

Follow Us