OK हा शब्द नेमका कसा तयार झाला? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

| Updated on: Mar 09, 2021 | 4:13 PM

OK या शब्दाचा उपयोग दररोज कित्येकजण कितीतरी वेळा करतात. (What Is Full Form Of OK)

OK हा शब्द नेमका कसा तयार झाला? जाणून घ्या संपूर्ण इतिहास
OK
Follow us on

मुंबई : आपण सर्वचजण हल्ली डिजीटल जगात वावरतो. या डिजीटल युगात वावरताना आपण काही ठराविक शब्द नेहमी वापरतो. त्या शब्दांपैकी एक शब्द म्हणजे OK….! OK या शब्दाचा उपयोग दररोज कित्येकजण कितीतरी वेळा करतात. मात्र हा शब्द नेमका कसा तयार झाला? त्याच्या मागचा इतिहास काय? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (What Is Full Form Of OK)

OK हे या शब्दात दोन शब्द आहेत. जो O आणि K या दोन शब्दांनी सुरु होतो. OK या शब्दाचा अर्थ सर्व काही व्यवस्थित आहे, हे सांगण्यासाठी केला जातो. त्याशिवाय OK म्हणजे एखाद्या गोष्टीवर सहमती दर्शवणे किंवा होकारार्थी या अर्थानेही वापरला जातो.

OK चा इतिहास

OK या शब्दाचा इतिहास जवळपास 180 वर्षे जुना आहे. 1830 च्या दशकाच्या शेवटी या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी एखादा शब्द पूर्ण बोलण्याऐवजी शॉर्ट फॉर्ममध्ये बोलण्याचा ट्रेंड होता. OK या शब्दाचा शोध चुकीच्या उच्चारामुळे लागला होता.

OK शब्दाचा प्रयोग सर्वात पहिल्यांदा 1839 मध्ये करण्यात आला होता. या शब्दाचा फुल फॉर्म ‘oll korrect’ असा आहे. इतकंच नाही तर OK शब्दाचा केवळ एकच नाही तर अनेक फुल फॉर्म सांगितले जातात. (What Is Full Form Of OK)

OK चे काही फुल फॉर्म

OK – All Correct
OK – All Clear
OK – Okay
OK – Objection Killed
OK – Objection Knocked
OK – Oll Korrect

OK चा सर्वप्रथम वापर कोणी केला?

OK हा शब्द अमेरिकतल्या बोस्टन शहरात म्युनिसिपल कॉर्पोरेशन द्वारा लागू केल्या गेलेल्या एका कायद्याविरोधात Anti-Bell-Ringing-Society शी संबंधित आहे. काही लोकांच्या मते स्कॉटिश शब्द och aye (meaning- “oh yes”) किंवा ग्रीक शब्द ‘ola kala’ (meaning- “All Good”) या शब्दांचा अपभ्रंश होऊन ok या शब्दाची निर्मिती झाली असावी, असे बोललं जाते. पण सर्वमान्य भाषातज्ज्ञांच्या मते Anti-Bell-Ringing-Society हीच या शब्दाची जननी आहे, असे मानले जाते.

Allen Walker Read यांनी या शब्दाच्या उत्पत्तीबाबत गंभीररीत्या संशोधन केले होते. त्यांच्या मते, या शब्दाचा लिखित वापर सर्वात आधी 23 मार्च 1839 रोजी बोस्टन मॉर्निग पोस्टने केला होता. लेखक चार्ल्स गार्डन ग्रीन यांनी आपल्या लेखात सर्वप्रथम OK या शब्दाचा वापर केला.

OK शब्दाचे काही प्रयोग

OK हा मूळ इंग्रजी भाषेतील शब्द आहे. प्रसिद्ध विद्वान Allan Metcalf हे OK: The Improbable Story Of America’s Greatest Word नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकानुसार OK हा जगात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द आहे. (What Is Full Form Of OK)

संबंधित बातम्या : 

International Women’s Day 2021 : 112 वर्षांपूर्वी एका आंदोलनापासून प्रारंभ, महिला दिन कसा सुरु झाला?

International Women’s Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान