Gravity Challenge नेमकं काय? गुडघ्यावर रेलून पाठीवर हात ठेवण्याचं चॅलेंज तुम्हाला जमेल?

| Updated on: Mar 06, 2021 | 1:53 PM

सध्या सोशल मीडियावर Gravity challenge ची चर्चा आहे. जमिनीवर गुडघ्यावर झोपून, हात पाठीवर ठेवून तोल सांभाळणे किंवा बॅलन्सिंग करण्याचं हे चॅलेंज आहे.

Gravity Challenge नेमकं काय? गुडघ्यावर रेलून पाठीवर हात ठेवण्याचं चॅलेंज तुम्हाला जमेल?
Gravity Challenge
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social media new challenge) नेहमी कोणतं ना कोणतं चॅलेंज सुरु असतं. असेच चॅलेंज व्हिडीओ व्हायरल होतात आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असेच ट्रेंड पाहायला मिळतात. जसे, #no makeup challenge, saree challenge, #couplechallenge वगैरे. अशा चॅलेंजमध्ये नेटकरी उत्साहाने सहभागी होत असल्याचं आपण पाहिलं आहे. (What is gravity challenge social media trending)

सध्या सोशल मीडियावर Gravity challenge ची चर्चा आहे. जमिनीवर गुडघ्यावर झोपून, हात पाठीवर ठेवून तोल सांभाळणे किंवा बॅलन्सिंग करण्याचं हे चॅलेंज आहे. गुडघ्यावर बसून पुढे झुकून हात व्ही शेपमध्ये ठेवायचे आणि चेहरा झाकायची ही कसरत आहे. शेवटच्या स्टेपमध्ये दोन्ही हात पाठीवर ठेवून तोल सांभाळायचा आहे.


सोशल मीडियावर ग्रॅव्हिटी चॅलेंजमध्ये अनेकजण सहभागी होत आहेत. अनेकांना तोल सांभाळताना कसरत करावी लागत आहे. कोणी व्यवस्थित करत आहे तर कुणी तोंडावर आपटत आहे. या कसरतीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या व्हिडीओंचे मीम्सही व्हायरल होत आहेत. लोक असे व्हिडीओ शेअर करुन आपल्या कमेंट अॅड करत आहेत.

पाहा व्हिडीओ 

(What is gravity challenge social media trending)

संबंधित बातम्या 

पाठवणी करताना नववधूला भावना अनावर, रडता-रडताच कार्डिअ‍ॅक अरेस्टने मृत्यू

अग्नीसमोर सात नाही तर आता 8 वचनं घ्यावी लागणार, याशिवाय लग्न अपूर्ण! वाचा सविस्तर