पाठवणी करताना नववधूला भावना अनावर, रडता-रडताच कार्डिअ‍ॅक अरेस्टने मृत्यू

भावनिकदृष्ट्या तणावपूर्ण घटनेमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्ट होऊ शकतो. ज्यामुळे हृदयाची प्रभावीपणे रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असं कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील डॉक्टरांनी सांगितलं. (Odisha bride cardiac arrest crying)

पाठवणी करताना नववधूला भावना अनावर, रडता-रडताच कार्डिअ‍ॅक अरेस्टने मृत्यू
ओदिशात पाठवणीवेळी नववधूचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 11:40 AM

भुवनेश्वर : माहेर सोडून सासरची वाट धरताना नववधू जड अंतकरणाने कुटुंबाला निरोप देते. आई, वडील, भावंडांना सोडून पतीकडे जाताना तिच्या डोळ्यात गंगा जमुना उभ्या राहतात. मात्र ओदिशातील नववधूला भावनांचा आवेग अनावर झाला. रड-रड रडल्यानंतर कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्याने नववधूचा मृत्यू झाला. (Odisha bride dies of cardiac arrest after crying excessive)

पाठवणीवेळी रडता-रडता बेशुद्ध

ओदिशातील सोनेपूर जिल्ह्यातील जुलुंदा गावात ही घटना घडली. गुप्तेश्वरी साहू हिचा विवाह गुरुवारी संध्याकाळी बोलंगीर जिल्ह्यातील बिसीकेसन प्रधानसोबत झाला. प्रथेनुसार शुक्रवारी सकाळी तिच्या पाठवणीची तयारी सुरु होती. सासरी जाण्यासाठी गुप्तेश्वरी निघत होती, तोच तिला हुंदका अनावर झाला आणि रडता-रडताच ती बेशुद्ध पडली.

गुप्तेश्वरीला तातडीने डुंगुरीपल्लू कम्युनिटी हेल्थ सेंटरला पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. कार्डिअ‍ॅक फेल्युअरमुळे गुप्तेश्वरी साहूचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच निधन

“पाठवणी करताना ती सातत्याने रडत होती. आम्हाला माहित आहे की ती अतीव दुःखात होती. तिच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. तिच्या मामांनी लग्नाची तयारी केली होती. नियती इतक्या क्रूरपणे तिची अखेर करेल, हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. ती खूपच गोड मुलगी होती, असंही एका गावकऱ्याने सांगितलं.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट कशामुळे होतो?

भावनिकदृष्ट्या तणावपूर्ण घटनेमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्ट होऊ शकतो. ज्यामुळे हृदयाची प्रभावीपणे रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असं कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील डॉक्टरांनी सांगितलं. (Odisha bride dies of cardiac arrest after crying excessive)

कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे काय?

कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये हृदयाचा रक्तपुरवठा पूर्णत: बंद होतो. हृदयात वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होतो. त्यामुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये काही मिनिटातंच मृत्यू होऊ शकतो.

कार्डिअ‍ॅक अरेस्टची लक्षणं काय?

खरंतर कार्डिअ‍ॅक अरेस्ट अचानक होतो. पण ज्यांना हृदयाचा आजार आहे, त्यांच्यात कार्डिअ‍ॅक अरेस्टची शक्यता जास्त असते. कधी कधी कार्डिअ‍ॅक अरेस्ट येण्याआधी छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, छातीत धडधड, चक्कर, शुद्ध हरपणं, थकवा किंवा अंधारी येणं यांसारखी लक्षणं आढळतात.

संबंधित बातम्या :

एक तर प्रेमविवाह, त्यात लग्नाच्या दिवशीच संशयास्पद मृत्यू, पतीही गेला, जळगावात काय घडलं?

(Odisha bride dies of cardiac arrest after crying excessive)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.