
आपण रस्त्यावरुन गाडीने प्रवास करत असताना सफेद रेषा पाहतो. काही ठिकाणी सलग सफेद रेष असते, तर काही ठिकाणी सफेद रेष तुटक-तुटक असते. काही ठिकाणी पिवळया रंगाची रेष असते. मात्र, या रेषांचा नेमका अर्थ आपल्याला माहिती नसतो.

रस्त्यावर जर सलग पांढरी रेष दिसत असेल तर त्या भागात असताना गाडीची लेन चेंज करु नये. एका लेनमधून गाडी चालवत राहावे.

रस्त्यावरील सफेद रेषा तुटक असेल तर तुम्ही योग्य ती काळजी घेऊन लेन चेंज करु शकता.

संग्रहित छायाचित्र.

रस्त्यावरील दोन ठळक पिवळ्या रेषा म्हणजे तुम्ही गाडी एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये टाकू शकत नाही.

रस्त्याच्या मधोमध एका बाजूला एक सलग पिवळी रेषा आणि त्याच्या बाजूला तुटक पिवळी रेषा असेल तर, रेष तुटक असणाऱ्या भागातील लोक ओव्हरटेक करु शकतात. मात्र, दुसऱ्या बाजून येणारी वाहने ओव्हरटेक करु शकत नाहीत.