म्हणून साप शेपटीतून आवाज काढतो? कारण जाणून धक्का बसेल

सापाला पाहिलं तरी कोणालाही घाम फुटेल. सापाच्या असंख्य प्रजाती असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण तुम्हाला माहितीये का की एक साप असा आहे की जो त्याच्या शेपटीतून आवाज काढतो. या सापाचं विष अत्यंत विषारी मानलं जातं.

म्हणून साप शेपटीतून आवाज काढतो? कारण जाणून धक्का बसेल
Rattlesnake
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 17, 2025 | 7:31 PM

साप म्हटलं की सर्वांच्या अंगावर शहारा येतो. सापचे कितीतरी प्रकार आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की साप फु्त्कारतो तेव्हा तो सतर्क झाला आहे किंवा तो आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हे लक्षात येत. पण तुम्हाला माहितीये का की एक असाही साप आहे जो चक्क त्याच्या शेवपटीतून आवाज काढतो. होय, रॅटलस्नेक नावाचा साप हा त्याच्या शेपटीतून एका विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो. एवढंच नाही तर या सापाचं विषही माणसांसाठी अत्यंत धोकादायक असतं.

साप अंधारातही आपल्या शिकारावर हल्ला करू शकतो

रॅटलस्नेक आपल्या शेपटीच्या खास रचनेमुळे शेपटीमधून आवाज काढू शकतो. या सापाचं विष माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहे. जर वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर बाधित व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. विशेष म्हणजे, हा साप अंधारातही आपल्या शिकारावर हल्ला करू शकतो. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘इंस्टाग्राम’वर हा व्हिडिओ @therealmowgliii या युजरच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रॅटलस्नेक आपली शेपटी वेगाने हलवून जोरजोरात आवाज काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे.

आपल्या शेपटीने आवाज काढणारा साप किती खतरनाक 

रॅटलस्नेक आपल्या शेपटीने आवाज काढतो कारण त्याच्या शेपटीच्या टोकाला असलेल्या विशेष, जोडलेल्या खवल्या एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे गुंजन आवाज येतो. ही खवल्या केराटिनपासून बनवलेल्या असतात, ज्याचा वापर मानवी केस आणि नखांसाठीही होतो. जेव्हा रॅटलस्नेक आपली शेपटी कंपन करतो. तेव्हा खवल्या एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे आवाज येतो. हा आवाज संभाव्य भक्षकांना सावध करतो किंवा शत्रूला दूर ठेवतो. अहवालानुसार, सापाच्या शेपटीच्या स्नायू प्रति सेकंद 90 वेळा हलू शकतात, ज्यामुळे हा आवाज निर्माण होतो. रॅटलस्नेक शिकारींना चेतावणी देण्यासाठी हा आवाज काढतात.

रॅटलस्नेकचं धोकादायक विष

रॅटलस्नेकचं विष माणसांसाठी अत्यंत घातक आहे. अमेरिकेत सर्वात विषारी विष ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेकचं आहे. रॅटलस्नेकचं विष सायटोटॉक्सिक आहे. काही रॅटलस्नेकच्या विषात न्यूरोटॉक्सिक गुणधर्मही असतात. जर बाधित व्यक्तीला वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळणारा हा साप पक्षी आणि उंदीरासारख्या छोट्या प्राण्यांची शिकार करतो. रॅटलस्नेकला जगातील सर्वात अलीकडील विकसित साप मानलं जातं.