गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान हिरवा कपडा का वापरतात? जाणून घ्या कारण

| Updated on: May 10, 2021 | 9:48 AM

तुम्ही कधी विचार केलात का की गगनचुंबी इमारतींचे बांधकाम सुरु असताना ती इमारत हिरव्या कपड्याने का झाकली जाते? नाही ना... (Green Cloth used to Cover the Buildings Construction)

गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान हिरवा कपडा का वापरतात? जाणून घ्या कारण
Green cloths building
Follow us on

मुंबई : सध्या अनेक मेट्रो शहरात मोठमोठ्या, टोलेजंग इमारती उभारल्या जात आहे. अनेक मोठ्या क्रेन आणि मशीनच्या मदतीने या इमारती उभ्या केल्या जात आहेत. एखाद्या बिल्डींगच्या आजूबाजूला मशीन, रेती किंवा इतर बांधकाम साहित्य दिसलं की आपण लगेच समजून जातो या बिल्डींगचे बांधकाम अद्याप सुरु आहे. पण या बांधकाम साईटवर आणखी एक गोष्ट दिसते ती म्हणजे हिरवा कपडा….बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींगच्या भोवती हा हिरवा कपडा असतो. पण तुम्ही कधी विचार केलात का की गगनचुंबी इमारतींचे बांधकाम सुरु असताना ती इमारत हिरव्या कपड्याने का झाकली जाते? नाही ना…मग चला आज जाणून घेऊया. (Why Green Cloth used to Cover the Buildings Construction)

हिरव्या कपड्याने बांधकाम झाकण्याचे कारण काय?

बांधकाम सुरु असलेली बिल्डींग हिरव्या कपड्याने झाकल्या जाण्यामागील प्रमुख कारण म्हणजे उंचीवर काम करत असलेल्या कामगारांचे लक्ष विचलित करणे. कारण जर त्यांनी इतक्या उंचीवर खाली पाहिले, तर ते विचलित होतील. हे त्यांच्यासाठी प्राणघातक ठरु शकते.

तसेच त्या बिल्डींगच्या आजूबाजूने जाणारे अनेक जण त्या इमारतींकडे पाहत असतात. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव येऊ नये, म्हणून बिल्डींगला हिरव्या कपड्याने झाकले जाते.

सर्वात महत्त्वाचे कारण काय?

ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु होते, त्या बांधकाम साईटवर मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर केला जातो. त्यामुळे धूळ आणि सिमेंटचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्यांना होण्याची शक्यता असते. अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र लोकांची या त्रासापासून काही प्रमाणात मुक्ती व्हावी यासाठी त्या इमारतीच्या भोवती हिरवा कपडा लावतात. जेणेकरून त्यातून बाहेर निघणारी धूळ, माती, सिमेंट बाहेर येऊ शकणार नाही.

हिरवा रंगच का?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, फक्त हिरवा रंगच का? लाल, पांढरा किंवा इतर कोणत्या रंगाचा कपडा त्या इमारतीच्या भोवती लावता येऊ शकतो. याचे उत्तर अगदी साधे आहे. हिरवा रंग हा दूरवरुन सहजरित्या दिसतो. रात्रीच्या मंद प्रकाशातही हिरवा रंग स्पष्टपण दिसतो. त्यामुळेच इमारती हिरव्या कपड्याने झाकल्या आहेत.

म्हणूनच, जेथे जेथे मोठ्या इमारती बांधल्या जातात. त्याच्या आजूबाजूला हिरवा कपडा लावला जातो. जेणेकरुन ती इमारत पूर्णपणे सुरक्षित राहिल. तसेच इतर कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. (Why Green Cloth used to Cover the Buildings Construction)

संबंधित बातम्या : 

सनईचे चौघडे वाजले, नवरदेव वरमाला घालणार तेवढ्यात दोनच्या पाढ्याने घात केला, थेट लग्नच मोडलं, नेमकं काय घडलं?

Happy Mother’s Day: मातृदिनानिमित्त काही खास मेसेज, अशा व्यक्त करा भावना