डॉक्टरांचं अक्षर इतके खराब का असते ? काय कारण यामागे ?
अनेकदा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधाची चिट्टी वाचताना आपले डोकं दुखू लागते. कितीही प्रयत्न केला तरी हे अक्षर समजणे कठीण असते. डॉक्टर काही जाणूनबुजून असे गिचमिड अक्षर काढत नाहीत तर या मागे एक कारण आहे, कोणते ते पाहूयात...

आपण नेहमीच म्हणत असतो की सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे. परंतू डॉक्टर आणि सुंदर अक्षर यांचा ३६ चा आकडा आहे. डॉक्टरांची औषधाची चिट्टी वाचनं म्हणजे डोकेदुखीचं काम आहे.डॉक्टरानी लिहून दिलेली चिट्टी एकतर दुसरा डॉक्टर वाचू शकतो. किंवा मेडिकल स्टोअर्समध्ये असलेले कर्मचारी ही चिट्टी वाचून औषधे आपल्या देशात. बरं हे केवळ भारतातील डॉक्टरांच्या अक्षराबाबत नसून जगभरातील डॉक्टरांची अक्षरं अशाच प्रकाराची कोणालाही वाचता न येणारी असतात. हे अगम्य अक्षर नेहमीचा मेडिकस स्टोअर्सवालाच वाचू शकतो.
आता अशा परिस्थितीत, आपण चांगलं सुशिक्षित असूनही, स्वतःच्या औषधांसाठी पूर्णपणे फार्मासिस्टवर आपल्याला अवलंबून राहावे लागते. परंतू तुम्हाला डॉक्टरांच्या अगम्य हस्ताक्षरामागील कारणं जाणून घ्यायची असतील. तर या लेखात आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर सांगणार आहोत.
डॉक्टरांचं अक्षर का खराब असते ?
डॉक्टर देवेन्द्र, जे सध्या मोती लाल नेहरू रुग्णालयात प्रॅक्टीस करीत आहेत, त्यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की डॉक्टर बनण्यासाठी खूपच मेहनत केलेली असते. त्यांना काम करताना मोठ-मोठ्या परीक्षा द्यावा लागतात. याच कारणामुळे त्यांना वेगाने लिहीण्याचा छंद लागतो. डॉक्टरांची हँण्डरायटिंग इतकी वाईट असण्यामागे त्यांचे वेगाने लिहीणे एक कारण असावे…
वेळेची कमतरता
डॉक्टर सारखे व्यस्त असतात. त्यांना काम करताना अनेक रुग्णांना पाहावे लागते. प्रत्येक पेशंटचे डिटेल्स, लक्षणं, सॉल्युशन आणि औषधे लिहीताना त्यांना प्रत्येक शब्द नीट लिहायला तितका वेळ नसतो. ते वेगाने विचार करतात आणि लिहीतात. त्यामुळे त्यांचे अक्षर खराब होते…
लिहून लिहून कंटाळा
मेडिकलचा अभ्यास आणि डॉक्टर बनण्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यासा दरम्यान मोठ्या प्रमाणात नोट्स काढाव्या लागतात. केस हिस्ट्री आणि प्रिस्क्रिप्शन लिहावे लागते. इतका अभ्यास करताना त्यांच्या हाताचे स्नायू दुखू लागतात. त्यामुळे त्याचा परिणाम अक्षरावर होत असतो. मेडिकलच्या क्षेत्रातील लोकच हे अक्षर समजू शकतात. त्यास सर्वसामान्यांना वाचणे कठीण होते.
प्रेशर आणि स्ट्रेस आहे कारण
डॉक्टरांना नेहमीच प्रेशर आणि स्ट्रेसच्या वातावरणात काम करावे लागते. त्यांना तातडीने निर्णय घ्यावे लागतात इमर्जन्सीची सिच्युएशनमध्ये लिहावे लागत असते. ताण आणि तणावाचा त्यांच्या अक्षरावर परिणाम होत असतो. तर काही लोकांचे मुळातच अक्षर खराब असते.