उन्हाळ्यात काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे का वापरु नये? जाणून घ्या Interesting कारण

| Updated on: May 16, 2021 | 1:26 PM

काळ्या रंगाचे किंवा गडद रंगाचे कपडे उन्हाळ्यात वापरु नका, असे का सांगितले जाते? चला तर आज यामागचे कारण जाणून घेऊया. (Why should we avoid black clothes in summer season)

उन्हाळ्यात काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे का वापरु नये? जाणून घ्या Interesting कारण
summer
Follow us on

मुंबई : मे महिना म्हटलं की कडक उन्हाळा… हे जणू समीकरणच बनलं आहे. उन्हाळ्यात अंगालीच अक्षरश: लाही-लाही होते. घरातून बाहेर पडल्यानंतर कडक ऊन त्यातच वाऱ्याचा अभाव त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघतात. त्यामुळे उन्हाळ्यात सूती कपडे वापरा, तसेच गडद रंगाचे कपडे घालू नका असा सल्ला अनेकदा दिला जातो. जर तुम्ही उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घातले तर मग तुम्हाला उन्हाचा आणखी त्रास होतो. पण काळ्या रंगाचे किंवा गडद रंगाचे कपडे उन्हाळ्यात वापरु नका, असे का सांगितले जाते? याच्यामागचे नेमके कारण तुम्हाला माहिती आहे का? चला तर आज यामागचे कारण जाणून घेऊया. (Why should we avoid black clothes in summer season)

उन्हाळ्यात काळे कपडे का घालू नये?

काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त गरम होण्याचे मुख्य कारण म्हणजे हा रंग उष्णतेचा शोषण (Absorption) करतो. उन्हाळ्यात काळा कपडा परिधान केल्यानंतर त्यात शोषून घेतलेली उष्णता लवकर परावर्तित (Reflected) होत नाही. त्यामुळे या रंगाच्या कपड्यांमध्ये फार जास्त उष्णता जाणवते. या कारणामुळे उन्हाळ्यात काळे कपडे घालू नये असे सांगितले जाते.

उन्हाळ्यात जेव्हा सूर्याची किरण काळ्या किंवा गडद रंगाच्या कपड्यांवर पडतात. त्यावेळी ती त्यावर बराच काळ राहतात. ते त्या कपड्यातून पटकन निघत नाहीत. त्यामुळे हे कपडे जास्त दिवस उबदार राहतात. यामुळे ते कपडे घालणाऱ्याला जास्त काळ उष्णता जाणवते.

पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे का वापरावे?

त्याउलट उन्हाळ्यात सूती, फिकट किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, असा सल्ला दिला जातो. कारण पांढऱ्या रंगाच्या कपड्यात उष्णतेचे कमी शोषण (Absorption) होते. याचाच अर्थ असा की पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या कपड्यांवर सूर्याचा प्रकाश जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे यात फारसे गरम होत नाही. यामुळे उन्हाळ्यात लोक पांढर्‍या कपड्यांना जास्त प्राधान्य देतात.

उन्हाळ्यात वापरा हलके-फुलके कपडे 

उन्हाळ्याच्या सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असते. यामुळे हलके-फुलके कपडे घालावे, असे सांगितले जाते. कारण फिकट रंगाचे कपडे घातल्याने सूर्य प्रकाश परावर्तित होतो. ज्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. त्या उलट थंडीच्या दिवसात गडद रंगाचे कपडे घालावे. थंडीच्या दिवसात गडद रंगाचे कपडे उष्णतेचे शोषण करून शरीराला उबदारपणा देतात. त्यामुळे तुम्हाला थंडीत आराम मिळतो. यामुळे उन्हाळ्यात सुती, शिफॉन, जॉर्जेट, क्रेपसारखे पातळ आणि हलके कपडे घालावे. (Why should we avoid black clothes in summer season)

संबंधित बातम्या : 

भारतीय रेल्वेतील जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या

नवीन पर्स, बॅग, बूट इतर गोष्टींमध्ये असलेल्या छोट्या सिलिका पॅकेट्स नेमके का वापरतात? त्याच्या मागचे कारण काय?