AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : हा प्रकार रेकॉर्ड केला नसता तर काय झालं असतं? TC ने महिलेकडे तिकीट मागताच तिच्याकडून चारचौघात लाज वाटेल असं कृत्य, व्हिडिओ व्हायरल

VIDEO :एक्सप्रेस ट्रेनमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिकीट तपासनीस आणि महिलेमधल्या वादाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

VIDEO : हा प्रकार रेकॉर्ड केला नसता तर काय झालं असतं? TC ने महिलेकडे तिकीट मागताच तिच्याकडून चारचौघात लाज वाटेल असं कृत्य, व्हिडिओ व्हायरल
Train Viral Video Women
| Updated on: Sep 19, 2026 | 11:05 AM
Share

एक्सप्रेस ट्रेनमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिकीट तपासनीस टीसीशी झालेल्या वादानंतर एका महिलेने स्वत:चे कपडे फाडले. तिकीटाबाबत टीसीने या महिलेकडे विचारणा केली. टीसीने या महिलेला तिकीट दाखवायला सांगितलं. पण या महिलेकडे तिकीट नव्हतं. ती विदआऊट तिकीट प्रवास करत होती. या महिलेने तिकिटाऐवजी टीसीला कॅश देऊ केली, असं या महिलेसोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाने सांगितलं. माझा भाऊ रेल्वे कर्मचारी असल्याचाही महिलेने दावा केला. टीसी आणि या महिलेमध्ये शाब्दीक बाचबाची सुरु झाली. त्यातून तणाव वाढत गेला. ही महिला फोनवरुन तिच्या भावाशी बोलत होती. टीसी माझे कपडे उतरवण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप या महिलेने भावाशी बोलताना केला.

इर्मजन्सी हेल्पलाइन नंबर 112 ला फोन कॉल करण्याची तिने धमकी दिली. टीसीची वागण्याची पद्धत चुकीची आहे असं तिचं म्हणणं होतं. टीसीने तिला नाव विचारलं, तेव्हा तिने राधिका तिवारी असं सांगितलं. हे भांडण सुरु असताना महिलेने तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. टीसीवर तिने विनयभंगाचा तसच अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप केला. टीसी हा सर्व वाद त्याच्या मोबाइलवर रेकॉर्ड करत होता. या व्हिडिओमधून भांडणाचं नेमकं कारण समजू शकतं.

अशावेळी प्रवासी कुठे मदत मागू शकतात?

रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी असलेल्या रेल्वे सेवा या अधिकृत टि्वटर अकाऊंटने या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. कारवाईसाठी पुरावे उपलब्ध करुन द्या असं रेल्वेसेवाने म्हटलं आहे. प्लीज पीएनआर नंबर, मोबाइल क्रमांक शेअर करा. जेणेकरुन आम्हाला कारवाई करता येईल. तुम्ही थेट रेलमदत किंवा 139 नंबरवर डायल करुन मदत मागू शकता असं रेल्वे सेवाने म्हटलं आहे.

ही ट्रेन कुठली होती?

सोशल मीडियावर या वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. युजर्स व्हिडिओ रेकॉर्डिंगवर आणि या वादावर प्रश्न उपस्थित करतायत. ही ट्रेन कुठली होती? या वादात कोण लोक सहभागी आहेत? स्वतंत्रपणे या संबंधी काही तक्रार दाखल झालीय का? या बद्दल अजूनही कोणती ठोस माहिती नाहीय.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर