महिलेच्या अंतरवस्त्रांमध्ये 1 किलो सोनं, बाटलीचं झाकणही सोन्याचं! Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

एका महिलेच्या बॅगेतून सुमारे 1 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. हे सोनं महिला अंतरवस्त्रामध्ये लपवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. या महिलेने लपवलेले सोने जेव्हा अधिकाऱ्यांनी पकडले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

महिलेच्या अंतरवस्त्रांमध्ये 1 किलो सोनं, बाटलीचं झाकणही सोन्याचं! Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Viral Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 28, 2025 | 12:56 PM

पैसा आणि सोनं अशी वस्तू आहे, जी पाहताक्षणी लोकांचे डोळे चमकतात. त्यामुळेच देशात सोन्याच्या तस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. तस्करी करण्यासाठी लोक रोज नवीन-नवीन युक्त्या वापरत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने ज्या प्रकारे सोने लपवण्याचा प्रयत्न केला ते पाहून अधिकारी देखील चक्रावले. तपासात या महिलेकडे जवळपास 1 किलो सोने सापडले आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली विमानतळावरील दोन धक्कादायक प्रकरणे समोर आली. यात पहिल्या प्रकरणात एका महिलेच्या बॅगेतून सुमारे १ किलो सोनं जप्त करण्यात आले. हे सोनं महिलाने तिच्या अंतरवस्त्रामध्ये लपवून ठेवलं होतं. पण हे लपवण्यासाठी तिने केलेला जुगाड हा एकदम विचित्र होता. तिने पाणी पिण्याच्या बाटलीच्या झाकणात १७० ग्रॅम सोनं लपवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विमानतळावरील अधिकारी सतर्क होते. त्यांनी महिलेने लपवलेले सोने पटकन पकडले.

वाचा: अनाया बांगरचा मोठा निर्णय, शस्त्रक्रियेच्या 3 महिन्यांनंतर पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळली

अंतरवस्त्रामध्ये सोनं सापडलं

24 ऑक्टोबर रोजी एक महिला फ्लाइट क्रमांक 8 एम-620ने टर्मिनल-3 वर म्यानमारहून दिल्लीला पोहोचली. कस्टम अधिकाऱ्यांना महिलेवर संशय आला. तिची तपासणी केली असता काळ्या अंडरवियरमधून सोन्याची जवळपास ६ बिस्किटे सापडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतलं. या सोन्याचे वजन जवळपास 996.5 ग्रॅम आहे. तसेच त्याची किंमत 1.17 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चौकशीत महिलेने कबूल केलं की ती म्यानमारहून तस्करी करून हे सोनं भारतात आणत होती.

पाण्याच्या बाटलीत सोनं

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport) 25 आणि 26 ऑक्टोबरच्या रात्री एका पुरुष प्रवाशाची तपासणी सुरू करण्यात आली. हा व्यक्ती फ्लाइट क्रमांक AI-996 ने दुबईहून दिल्लीला आला होता. फ्लाइटच्या गेटपासूनच या व्यक्तीवर गुप्तपणे नजर ठेवली जात होती. त्यानंतर ग्रीन चॅनेलच्या एक्झिट गेटवर त्याला थांबवण्यात आलं. जेव्हा तपासणी केली तेव्हा पाण्याच्या बाटलीच्या झाकणात सोनं लपलेलं आढळलं. झाकणातून 170 ग्रॅम सोनं बाहेर पडलं. बाजारातील याची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अधिकारी सर्व पैलूंची तपासणी करत आहेत.