AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Beach Video | बिकनी गर्लमध्ये देशी अंदाज, हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘अरे काकी, कुठे पोहचली?’

Viral Beach Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिकनी गर्ल्समध्ये एका भारतीय महिलेने जलवा दाखवला. तेव्हा नेटकरी म्हणाले, 'अरे काकी, कुठे पोहचली?' 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Viral Beach Video | बिकनी गर्लमध्ये देशी अंदाज, हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'अरे काकी, कुठे पोहचली?'
बिकनी गर्ल्समध्ये काकीचा जलवाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 24, 2022 | 2:34 PM
Share

Viral Beach Video | समुद्र किनारा (Beach) म्हटलं की धमाल आणि धमाल. अनेक जण बीचवर जाऊन मजा करतात. फिरतात, सनबाथचा आनंद घेतात. कोणी समुद्रावर रपेट मारुन येते. तर बीच हा आनंददायी असतो. परदेशात तर बिकनी गर्लचा जलवा असतो. आता या बिकनी गर्लमध्ये (Bikini Girls) संपूर्ण भारतीय पहेरावात एखादी स्त्रीने रपेट मारली तर कसे वाटेल? आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आणि पाश्चिमात्य बिकनीसमोर पारंपारिक पद्धतीतील भारतीय महिलेला(Indian Traditional Lady) पाहून काहींना नाहक हसू ही येईल. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओत पहायला मिळाला. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिकनी गर्ल्समध्ये एका भारतीय महिलेने जलवा दाखवला. तेव्हा नेटकरी म्हणाले, ‘अरे काकी, कुठे पोहचली?’ 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

असे अनेक समुद्रकिनारे आहेत, जिथे बिकिनी घातलेल्या महिला दिसतात, पण परदेशात समुद्रकिनाऱ्यावर पारंपारिक कपड्यात आणि घुगंट घातलेली महिला कधी तुम्ही पाहिली आहे का? असे क्वचितच पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका भारतीय महिलेने पारंपारिक पोषाख परिधान केलेले आहा. आणि घुंगट घालून ती समुद्रकिन्यावर हसत हसत फिरत आहे. याशिवाय इतरही अनेक परदेशी महिला समुद्रकिनाऱ्यावर फिरत आहेत, त्या सर्वांनी बिकनी घातलेली आहे. या सर्व बिकनी गर्ल्समध्ये ही भारतीय महिला वेगळी दिसत आहे. छोट्या कपड्यातील महिलांसमोर देशी महिलेचा पूर्ण कपड्यातील हसरा चेहरा अनेकांना घायळ करतो. विशेष म्हणजे हा व्हिडिओ तयार करताना त्याला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्याने चार चांद लावले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहताना मजा येते. अनेकांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओला अनेक लोकांनी पसंती ही दर्शवली आहे.

पारंपारिक पोषाखातील महिलेची चर्चा

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ऋषिका गुर्जर नावाने शेअर करण्यात आला आहे आणि ‘अरे काकी, तू कुठे पोहोचली’ असे कॅप्शन त्याला देण्यात आले आहे. 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक करून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी ‘काकी योग्य ठिकाणी पोहोचली’ असे म्हणत आहेत, तर कोणी ‘ही आपली वेगळी ओळख आहे’ असे म्हणत आहेत. त्याचप्रमाणे आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘काकी सातासमुद्रापार पोहोचली आहे’.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.