इलेक्ट्रिक टुथब्रशने पकडून दिल की बाप्याचं लफडं! मग काय पत्नीने धु धु धुतलं

Electric Toothbrush : नवरा-बायकोत तिसरा कोणी आला तर नातं मोठं गुंतागुंतीचं होतं. पतीला रंगेहाथ पकडल्याच्या बातम्या काही नवीन नाही. पण इलेक्ट्रिक टुथब्रशच्या सहाय्याने त्याचं एका बायकोने झंगाट पकडल्याची घटना समोर आली आहे.

इलेक्ट्रिक टुथब्रशने पकडून दिल की बाप्याचं लफडं! मग काय पत्नीने धु धु धुतलं
मग काय पकडला ना भौ भावाला
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 08, 2025 | 4:07 PM

तर हे प्रकरण आहे गोऱ्या साहेबांच्या देशातील. पती-पत्नीचा संसार चांगला सुरू असताना, पतीच्या आयुष्यात एक पाखरू आलं. आपल्या पतीची लक्षणं काही ठीक नसल्याचं पत्नीच्या फार लवकरच लक्षात आलं. याच्या आयुष्यात दुसरं वादळं आल्याचं तिच्या लक्षात आलं. पण हा पठ्ठ्या काही ताकाला तुरी लागू देईना. आता पत्नीने त्याला स्मार्टली पकडायची योजना आखली. मोबाईल वा स्मार्टफोनचा वापर केला तर पती सतर्क होईल म्हणून तिने वेगळंच जुगाड जुळवलं बरं का! स्मार्ट इलेक्ट्रिक ब्रशच्या मदतीने तिने पुराव्यासह पतीचं झंगाट पकडलं. आता तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल की हे तिने कसं केलं?

प्रकरण तरी काय?

खासगी गुप्तहेर पॉल जॉन्सन यांनी हा किस्सा कथन केला आहे. मिरर युकेमध्ये त्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तर आपली मुलं नियमितपणे दात घासतात की नाही, हे पाहण्यासाठी या महिलेने स्मार्ट टुथब्रश आणले होते. त्यासाठीचे खास ॲप्लिकेशन तिच्या स्मार्टफोनमध्ये होते. या टुथब्रशचा डेटा पाहण्यासाठी तिने ॲप्लिकेशन उघडले तेव्हा तिला धक्काच बसला. कारण मुलं शाळेत असताना ही या ब्रशचा वापर होत असल्याचे तिच्या आले. विशेष म्हणजे त्या काळात तर तिचा नवरा सुद्धा घरी थांबत नव्हता.

सुरुवातीला तिला वाटलं की हा ॲप्लिकेशन एरर असावा. अथवा डाटा देताना मशीन काहीतरी गडबड करत असल्याचे तिला वाटले. पण एका ठराविक वेळेला आणि ठराविक दिवशीच असा प्रकार होत असल्याचे तिच्या लक्षात आले. आता मुलं शाळेत जातात. आपण आणि नवरा सुद्धा कामावर जातो. तर मग सकाळी 10.48 मिनिटाला कोण बरं ब्रश करत असेल? हा प्रश्न तिला सतावू लागला. घरातील साहित्य तर जागच्या जागी होतं. काही चोरी गेलेले नव्हतं. शुक्रवारीच हा प्रकार घडत असल्याचे तिच्या लक्षात आले. मग तिने गुप्तहेरावर ही कामगिरी सोपवली.

नवरोबाचा प्रताप उघड

मुलांच्या शाळेत जाऊन तपासणी करण्यात आली. तर मुलं ही शाळेतच होती. त्यांचा हजेरीपट पण चांगला होता. त्यात गडबड नव्हती. मग अर्थातच मोर्चा नवऱ्याकडे वळला. तेव्हा तो शुक्रवारी कार्यालयीन कामानिमित्त कुठं तरी हुंदडतो अथवा दांडी मारतो असे समोर आले. आता शुक्रवारी तो नेमका कुठं जातो या प्रश्नाचे उत्तर त्यानेच देऊन टाकले. गुप्तहेर त्याच्या मागावरच होते. त्यांनी त्याला एका स्त्रीसोबत त्याच्याच घरात जाताना कॅमेऱ्यात टिपले. मग पुढे नवऱ्याने घडाघडा आपल्या छंदाची माहिती दिली. आता पुढे काय झालं हे सांगायची गरज उरली आहे का?