AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: एलपीजीचा दर वाढवल्याने महिलांकडून सिलिंडरभोवती गरबा खेळून निषेध, महागाई विरोधात महिलांना अनोखं आंदोलन

6 ऑक्टोबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवरील दर वाढवले ​​होते. कंपन्यांनी 14.2 किलोच्या विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे.

Video: एलपीजीचा दर वाढवल्याने महिलांकडून सिलिंडरभोवती गरबा खेळून निषेध, महागाई विरोधात महिलांना अनोखं आंदोलन
तेलंगणातील जमीकुंता गावातल्या महिलांनी एक नवीन मार्ग अवलंबला. इथल्या महिलांनी नवरात्रीला सिलेंडरभोवती गरबा खेळून आपला निषेध व्यक्त केला.
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 4:59 PM
Share

एकीकडे कोरोनामुळे अनेक व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यातच आता महागाईनेही त्यावर ताण आणला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे भाव तर काही कमी व्हायला तयार नाही. एलपीजी 2 दिवसांपूर्वी पुन्हा महाग झाला आहे. एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याने लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत. म्हणूनच लोक गॅसच्या किमतींबाबत आपापल्या पद्धतीने विरोध व्यक्त करत आहेत, तेलंगणातील जमीकुंता गावातल्या महिलांनी एक नवीन मार्ग अवलंबला. इथल्या महिलांनी नवरात्रीला सिलेंडरभोवती गरबा खेळून आपला निषेध व्यक्त केला. (women protest against lpg price with celebrating bathukamma festival )

जमिकुंटाच्या महिलांनी पुन्हा स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिलांनी भरपूर कलशांच्या मधोमध गॅस सिलिंडर ठेवला आणि नंतर त्याभोवती गरबा खेळला. गरबा खेळताना महिलाही गाणी म्हणत होत्या. महिलांचा हा अनोखा निषेध पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आता याच घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहा:

6 ऑक्टोबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवरील दर वाढवले ​​होते. कंपन्यांनी 14.2 किलोच्या विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर, दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्याचबरोबर 5 किलोचा सिलिंडर आता 502 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत गॅस सिलिंडरचा दर जो आधी 884 रुपये होता तो आता 899 रुपयांवर जाऊन पोहचला आहे.

एकीकडे वाढती महागाई लोकांच्या जीवनासाठी सापळा बनत आहे. त्याच वेळी, लोक त्यांचे मत सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अनोखे मार्ग वापरत आहेत. महिलांनी केलेल्या अनोख्या कामगिरीचा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. म्हणूनच आता महिलांच्या विचित्र निषेधाचा व्हिडिओही लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. म्हणूनच लोक हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप शेअर करत आहेत.

हेही पाहा:

Video: एक टमटम, 4 पोलीस आणि पाणी साचलेला रस्ता, यूपी पोलिसांच्या नावाने व्हिडीओ व्हायरल

Video: नवरीच्या भावाने नवरा-नवरीला सोबत उचललं, आणि जमिनीवर फेकलं, अनोख्या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.