Video: नवरीच्या भावाने नवरा-नवरीला सोबत उचललं, आणि जमिनीवर फेकलं, अनोख्या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल

बधू आणि वर काही विधी करताना दिसत आहेत. या विधी दरम्यान दोघेही खूप वेगाने जमिनीवर पडतात, हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व लोक हसायला लागतात.

Video: नवरीच्या भावाने नवरा-नवरीला सोबत उचललं, आणि जमिनीवर फेकलं, अनोख्या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल
वधू आणि वर एकमेकांच्या जवळ उभे आहेत. तिसऱ्या व्यक्तीने दोघांना मागून एकत्र उचललं.

सोशल मीडियावर सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. ते इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होतात. काही व्हिडीओज इतके मजेदार असतात की, ते पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं हासणं नियंत्रित करू शकणार नाही.सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात वधू आणि वर काही विधी करताना दिसत आहेत. या विधी दरम्यान दोघेही खूप वेगाने जमिनीवर पडतात, हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व लोक हसायला लागतात. या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडतो. (Bride and groom fall down when lifted together for ritual Watch Viral Video)

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, वधू आणि वर एकमेकांच्या जवळ उभे आहेत. तिसऱ्या व्यक्तीने दोघांना मागून एकत्र उचललं. हवेत उचलल्यानंतर नववधू तिच्या हातातील तांदूळ मागच्या बाजूला फेकते. तेवढ्यात या दोघांनाही उचलणारा त्यांना अचानक खाली फेकतो, त्यामुळे दोघेही खाली पडतात. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीत हशा पिकतो.

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, व्हिडीओत तरी वधूवर जखमी झालेले दिसत नाही, किंवा पाहुणे मंडळींसमोर ते लागलेलं असतानाही दाखवत नाहीत. आता हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. याला 9 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 51,000 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर, सोशल मीडिया कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एकाने यावर कमेंट केली की, ‘कोणत्या जन्माचा सूड घेतोय हा भाऊ?.’ दुसऱ्याने लिहिले, ‘हा विधी नेमका आहे तरी काय?.’

हेही पाहा:

Video: हंड्यात पोरगी फसली, शर्थीचे प्रयत्न करुन हंडा कापला आणि पोरीला सोडवलं, व्हिडीओ व्हायरल

Video: बस, ट्रेन, मेट्रो आणि जहाजाने प्रवास करणारा भटका कुत्रा बोझी, सोशल मीडिया बोझीचीच चर्चा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI