Video: हंड्यात पोरगी फसली, शर्थीचे प्रयत्न करुन हंडा कापला आणि पोरीला सोडवलं, व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक 4 ते 5 वर्षांची मुलगी हंड्यात फसल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे आणि ही घटना कधीची आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Video: हंड्यात पोरगी फसली, शर्थीचे प्रयत्न करुन हंडा कापला आणि पोरीला सोडवलं, व्हिडीओ व्हायरल
एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक 4 ते 5 वर्षांची मुलगी हंड्यात फसल्याचं दिसत आहे.

लहानपणी पोरं काय करतील सांगता येत नाही, पोरांना या काळात इतकी उत्सुकता असते, की त्यांना काय करावं आणि काय नाही हे कळत नाही. आणि यातूनच मोठे अपघात होतात किंवा ही पोरं मोठ्या अडचणीत सापडतात. बोअरवेलच्या खड्डात पडलेल्या मुलांबद्दल वा कुठं ना कुठं फसलेल्या मुलांबद्दलच्या अनेक बातम्या येत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक 4 ते 5 वर्षांची मुलगी हंड्यात फसल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे आणि ही घटना कधीची आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. ( Caught in a pot of water. Cut the pot and set the girl free. The video went viral )

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खूप लोक जमा झालेले आहेत. एक आजोबा स्टिल कटर मशीन घेऊन बसले आहेत, त्यांच्यासमोर एक हंडा आहे, ज्याला ते कापत आहेत. हंड्याच्या आत एक कार्डबोर्ड आणि लाकूड घालण्यात आलं आहे. सुरुवातीला कळत नाही की इथं काय सुरु आहे. लोकांचा बोलण्याचा आणि मशीनचा आवाजही या व्हिडीओत येत आहे. आजूबाजूला काही महिलाही दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:


हे हंडा कापण्याचं काम खूप हळू हळू सुरु आहे. लोकांचा पेहराव आणि भाषेवरुन हा व्हिडीओ राजस्थानातील वाटतो आहे. आता हंड्याला उभी चीर मारण्यात आली आहे. मात्र तरीही हा हंडा वेगळा होत नाही आहे. तेवढ्यात हंडा फिरवला जातो, आणि हा कार्डबोर्ड बाजूला केला जातो, तेव्हा दिसतं की या हंड्यात एक पोरगी फसलेली आहे. या मुलीची या हंड्यातून सुटका करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे. हंडा कापताना मुलीला इजा होऊ नये म्हणून त्या कार्डबोर्ड आणि लाकडाचा तुकडा टाकण्यात आला आहे.

हंडा अर्धा कापला गेला आहे, मुलीला त्यातून काढण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र मुलगी रडायला लागली आहे. तेवढ्यात बाजूचे मिळू हंड्याचं तोंड मोठं करतात आणि बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर ही मुलगी बाहेर निघते. त्यानंतर सर्वजण हसू लागतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे, व्हॉट्सअपवरही हा व्हिडीओ फॉरवर्ड केला जात आहे. याआधी राजस्थानातच एका मुलीचं डोकं हंड्यात अडकलं होतं, त्यावेळीही अशाच प्रकारे हंडा कापून ते डोकं बाहेर काढावं लागलं होतं.

हेही पाहा:

Video: बस, ट्रेन, मेट्रो आणि जहाजाने प्रवास करणारा भटका कुत्रा बोझी, सोशल मीडिया बोझीचीच चर्चा

Video: बिबट्याचा घोरपडीवर लपून हल्ला, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI