
बुद्धिबळ हा खेळ अवघड मानला जातो कारण त्यासाठी खेळाची रणनीती, नियोजन, कौशल्ये, नियम आणि उद्दिष्टे यांची चांगली समज असणे आवश्यक असते. जर तुम्हाला या सर्व गोष्टींची समज असेल तर तुम्ही बुद्धिबळातील तज्ञ होऊ शकता. जेव्हा खेळाची गुंतागुंत वाढते, जेव्हा खेळाडू अधिक कुशल होतात. बुद्धिबळ खेळणाऱ्यांना नियोजन आणि समजूतदारपणाने खेळ कसा जिंकायचा हे चांगलं माहित असतं. विश्वनाथन आनंद हे भारतातील बुद्धिबळाचे मास्टर खेळाडू म्हणून ओळखले जातात. पण आता यापुढे आणखी एक नाव लक्षात ठेवावे लागणारे. ही ती व्यक्ती आहे जिने जागतिक विक्रम प्रस्थापित करून लोकांना आश्चर्यचकित केले.
भारतातील पुद्दुचेरी मधील एका मुलीने सर्वात वेगवान बुद्धिबळपटू असण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. पुद्दुचेरीच्या या मुलीने प्रचंड स्पीडमध्ये बुद्धिबळ संच आयोजित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. हे करत असताना तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एस.ओडेलिया जॅस्मिनचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती बुद्धिबळाचा सेट वेगाने मॅटवर ठेवत आहे. तिने 29.85 सेकंदात म्हणजेच सर्वात वेगात बुद्धिबळ संच तयार करून हा विक्रम प्रस्थापित केला.
व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये टांगलेल्या बॅनरवरून हा विक्रम 2021 मध्ये झाल्याचे दिसून येत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत वेबसाईटवर 20 जुलै 2021 च्या तारखेची पुष्टी करण्यात आली आहे.
एस. ओडेलिया जॅस्मिनचे हे विजेतेपद मिळवण्याचे सर्वात मोठे स्वप्न होते. हा विक्रम मोडण्यासाठी तिने वर्षभर सराव केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे की, यापूर्वी हे विजेतेपद इतर चौघांच्या नावावर होते.
डेव्हिड रश (अमेरिका) यांनी 2021 मध्ये 30.31 सेकंद, नकुल रामास्वामी (अमेरिका) यांनी 2019 मध्ये 31.55 सेकंद, अल्वा वेई (अमेरिका) यांनी 2015 मध्ये 32.42 सेकंद आणि 2014 मध्ये डालिबोर जाब्लानोविच (सर्बिया) यांनी 34.20 सेकंदासह विक्रम प्रस्थापित केला.