शादाब जकाती माझ्या पत्नीला तीन-तीन, चार-चार दिवसांसाठी…प्रसिद्ध यूट्यूबरवर नवऱ्याचा गंभीर आरोप
"जकाती हिला तीन-तीन, चार-चार दिवसांसाठी घेऊन जातो. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर बोलते तू मरुन जा. मला काही फरक पडत नाही" असा महिलेच्या पतीने यूट्यूबरवर गंभीर आरोप केला आहे.

सोशल मीडियावर वेगळी ओळख बनवणारा शादाब जकाती पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी व्हिडिओ कंटेट वादाचं कारण नाहीय. शादाब जकाती त्याच्यासोबत काम करणारी महिला आणि तिच्या पतीमधील वादाला कारण ठरला आहे. शादाब सोबत काम करणाऱ्या महिलेचा पती पोलीस ठाण्यात येऊन धायमोकलून रडत होता. पत्नीवर त्याने जीवे मारण्याचं कारस्थान रचल्याचा आरोप केला. इंचौली पोलीस ठाण्यात आलेल्या सोनूची हालत खूप खराब होती. पोलीस ठाण्यात आत आणि बाहेर तो हेच सांगत होता की, पत्नीला त्याला जीवे ठार मारायचं आहे. पोलिसांकडे त्याने स्वत:च्या आणि मुलांच्या सुरक्षेची मागणी केली. तो सांगत होता की, पत्नी त्याला न सांगता घरातून निघून जाते. यूट्यूबर शादाब जकाती सोबत व्हिडिओ बनवण्यासाठी ती बरेच दिवस बाहेर असते. खुर्शीदचा आरोप आहे की, पत्नी त्याला शादाबच्या सांगण्यावरुन धमकावते, शिव्या देते आणि वारंवार घटस्फोटची, पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची धमकी देत असते.
“मला ह्दयाचा आजार आहे. माझी तब्येत अनेकदा खराब असते. मात्र, तरीही पत्नी माझा मानसिक छळ करते” असं खुर्शीदच म्हणणं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो बोलतोय की, “माझ्या पत्नीला माझी काळजी नाही. लग्नानंतरही तिचे अनेकांसोबत संबंध होते. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता तिचं जकातीसोबत अफेअर सुरु आहे. जकाती हिला तीन-तीन, चार-चार दिवसांसाठी घेऊन जातो. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर बोलते तू मरुन जा. मला काही फरक पडत नाही”
त्याच्याविरोधात कुठला कट रचला जातोय
काही दिवसांपूर्वी पत्नी डेहराडूनला जाण्याबद्दल बोलली होती. त्याने विरोध केला तेव्हा बोलली की मी पोलीस ठाण्यात आहे. नंतर त्याला संशय आला की, त्याच्याविरोधात कुठला कट रचला जातोय. त्यांचं म्हणणं आहे की, त्याला जीवे मारण्याचं प्लानिंग सुरु आहे. यात अनेक लोक आहेत असे धक्कादायक आरोप महिलेच्या पतीने केले आहेत. पतीच्या आरोपानंतर महिला इरमने सुद्धा एक व्हिडिओ जारी केला. तिने नवऱ्याने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मी शादाब जकातीसोबत फक्त काम करते. त्या बदल्यात मला पैसे मिळतात असं इरमने सांगितंल. पती खुर्शीद मला सतत मारहाण करायचा आणि पैशांची मागणी करायचा असा आरोप इरमने केला.
माझ्या नवऱ्याला हे सहन होत नाही
“चार मुलांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. घर चालवण्यासाठी काम करायला मी मजबूर आहे. मी शादाब सोबत व्हिडिओ बनवते. त्याचे मला पैसे मिळतात. याच काही चुकीचं नाहीय. माझ्या नवऱ्याला हे सहन होत नाही. तो मला मारहाण करायचा. शिव्या द्यायचा. मी माझ्या मुलांच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी काम करतेय” असं इरमने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
