AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zero Shadow Day | महाराष्ट्रात 3 मे पासून 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस, तुमच्या शहरात किती तारखेला?

येत्या मे महिन्यात राज्यातील सर्व शहरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. (Zero Shadow Day in Summer 2021)

Zero Shadow Day | महाराष्ट्रात 3 मे पासून 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस, तुमच्या शहरात किती तारखेला?
shadow
| Updated on: Apr 30, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असं म्हटलं जाते. पण येत्या मे महिन्यात राज्यातील सर्व शहरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. राज्यात येत्या 3 मे पासून 31 मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या खगोलीय घटनेचे साक्षीदार व्हावे असे सांगितले जात आहे. (Zero Shadow Day in Summer 2021)

मुंबई, पुण्यात कधी घेता येणार अनुभव

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या 3 मे पासून 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस येत आहेत. तर मुंबई, नवी मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, वसई, विरार या ठिकाणी 15 मे पासून 28 जुलैपर्यंत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. यावेळी प्रत्येक शहरासाठी विविध दिवशी आणि वेळी शून्य सावली अनुभवता येणार आहे. त्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी 3 मे रोजी तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

विदर्भात 15 मे पासून अनुभवता येणार शून्य सावली

विदर्भात 15 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे शून्य सावली अनुभवता येईल. त्यानंतर 17 मे रोजी अहेरी, आल्लापल्ली, 18 मे मुलचेरा, 19 मे पुसद, बल्लारशा, चामोर्शी, 20 मे चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, 21 मे चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, 22 मे बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी, 23 मे खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रह्मपुरी, नागभीड, 24 मे शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर, 25 मे अमरावती, तेल्हारा, 26 मे नागपूर, भंडारा, परतवाडा, 27 मे परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, 28 मे वरुड,नरखेड येथे शून्य सावली अनुभवता येणार आहे.

तुमच्या शहरातील शून्य सावलीची माहिती एका क्लिकवर

दरम्यान तुम्ही https://alokm.com/zsd.html या लिंकवर क्लिक करुनही शून्य सावली दिवसाबाबत माहिती करुन घेऊ शकता. या लिंकवर गेल्यावर तुम्हाला घरबसल्या तुमच्या भागातील किंवा तुमच्या शहरातील शून्य सावली दिवस नेमका कधी आहे, त्याचा वेळ कधी आहे याची माहिती एका क्लिकवर मिळू शकते.

मुंबई 16 मे – 12.35 वाजता 27 जुलै – 12.44 वाजता
नवी मुंबई 15 मे – 12.34 वाजता 28 जुलै – 12.44 वाजता
ठाणे 16 मे – 12.34 वाजता 27 जुलै – 12.45 वाजता
पुणे 13 मे – 12.31 वाजता 30 जुलै – 12.41 वाजता
पिंपरी-चिंचवड 14 मे – 12.31 वाजता 29 जुलै – 12.41 वाजता
अहमदनगर 16 मे – 12.27 वाजता 27 जुलै – 12.38 वाजता
रत्नागिरी 7 मे – 12.33 वाजता 5 ऑगस्ट – 12.43 वाजता

सावली गायब होण्यामागची कारणं काय?

पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते.

या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगवेगळे दिवस आणि वेळा असतात. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12.35 या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. जेणेकरुन तुम्हाला शून्य सावली दिसू शकते.  (Zero Shadow Day in Summer 2021)

संबंधित बातम्या : 

Video | अभिनयच नाही तर, क्रिकेटही रश्मिकाची आवड, आवडती IPL टीम विचारताच म्हणाली…

VIDEO: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरात कोणती झाडं लावावी?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.