Zomato आणि swiggy ची सेवा काही शहरात स्थगित!, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

| Updated on: Apr 06, 2022 | 4:46 PM

झोमॅटो आणि स्विगी यांची सेवा काही शहरांमध्ये स्थगित झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा बंद झाली. हा तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या वतीने काम सुरू आहे.

Zomato आणि swiggy ची सेवा काही शहरात स्थगित!, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त
काही शहरात Zomato आणि swiggy ची सेवा स्थगित
Follow us on

मुंबई : झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या फुड डिलिव्हर करणाऱ्या कंपन्यांची सेवा काही शहरांमध्ये स्थगित झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा बंद झाली. हा तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या वतीने काम सुरू आहे. या सगळ्याबाबत आम्ही दिलगीर आहोत, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. “तांत्रिक बिघाडामुळे आम्हाला सध्या तुमच्या सेवेत येण्यास होत असलेल्या दीर्घ विलंबाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमच्या सेवेत असा अडथळा येणं, आम्हाला योग्या वाटत नाही. तज्ज्ञ मंडळी या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयतन करत आहेत. लवकरच आम्ही तुमच्या सेवेत दाखल होऊ”, असं स्विगीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. ट्विटरवर याबाबत ट्रेंड पाहायला मिळाला. काहींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

स्विगी-झॉमॅटोची सेवा स्थगित

झोमॅटो आणि स्विगी यांची सेवा काही शहरांमध्ये स्थगित झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा बंद झाली. हा तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या वतीने काम सुरू आहे. या सगळ्याबाबत आम्ही दिलगीर आहोत, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

झोमॅटोचं स्पष्टीकरण

“आम्ही काही तांत्रिक अडथळ्यांचा सामना करत आहोत. आमची टीम यावर काम करत आहे. आम्ही शब्द देतो की लवकरच तुमच्या सेवेत रुजू होऊ”, असं झोमॅटोने म्हटलंय.

स्विगीचं स्पष्टीकरण

“तांत्रिक बिघाडामुळे आम्हाला सध्या तुमच्या सेवेत येण्यास होत असलेल्या दीर्घ विलंबाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमच्या सेवेत असा अडथळा येणं, आम्हाला योग्या वाटत नाही. तज्ज्ञ मंडळी या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयतन करत आहेत. लवकरच आम्ही तुमच्या सेवेत दाखल होऊ”, असं स्विगीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

एका व्यक्तीने ट्विट करत स्विगीवर ऑनलाईन ऑर्डर देता येत नसल्याचं म्हटलंय.

झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाईन फुड डिलिव्हर करणाऱ्या कंपनी आहेत. दिवसात हजारो ऑर्डर या अॅप्सच्या माध्यमातून दिल्या जातात आणि या कंपन्यांकडूनही ऑर्डरकर्त्यांचे त्याचे आवडते पदार्थ सुरक्षितपणे पोहोचवले जातात.

संबंधित बातम्या

ऐकावं ते नवलच!, रात्री झोपली थेट 9 वर्षांनी उठली!, आईचा झाला होता मृत्यू, वाचा ‘स्लिपिंग गर्ल’बद्दल…

ST : आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद देणारी आणि घेणारी माणसं; पोस्ट वाचून म्हणाल, ‘अशी माणसं आजूबाजूला हवीत’

Viral Video : लग्नमंडपात रडायला लागला नवरदेव, नवरीला आलं हसू, शेवट अगदी गोड