Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारापेक्षा (Share Market) सुरक्षित असली तरी परतावा मात्र कमी मिळतो. रिस्क फॅक्टरमुळे अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराचा रस्ता टाळतात. त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड शेअर बाजारासोबत बाँड आणि इतर काही मालमत्तांमध्ये गुंतवणूक (Investment) करतात. फंड गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ (Portfolio)तयार करण्यास मदत करते. सोबतच त्यांचे पैसे गमावण्याचा धोका ही कमी करते. परंतु परतावा देण्याच्या बाबतीत म्युच्युअल फंड अनेकदा शेअर बाजारापेक्षा मागे असतात. पण एका फंडने हा गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे. या फंडने निफ्टीपेक्षा (Nifty) ही ज्यादा परतावा दिला आहे. हा फंड कोणता आहे? चला तर जाणून घेऊयात.