नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; सरकारच्या निर्णयामुळे PF खातेधारकांना होणार मोठा फायदा

| Updated on: Jun 18, 2021 | 9:58 AM

PF account | EPFO च्या घोषणेनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना EPFO खात्यातून आगाऊ पैसे काढले होते त्यांना आता दुसऱ्यांदा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. EPFO खात्यातील 75 टक्के रक्कम किंवा मूळ वेतन व महागाई भत्ता यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे पैसे पीएफधारकांना खात्यामधून काढता येतील.

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; सरकारच्या निर्णयामुळे PF खातेधारकांना होणार मोठा फायदा
पीएफ
Follow us on

मुंबई: कोरोना संकटामुळे कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO ने नोकरदारांसाठी अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच नोकरदारांना त्यांच्या खात्यातील भविष्य निर्वाह निधीपैकी (PF) 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर EPFO ने पीएफ धारकांना त्यांच्या खात्यातून आगाऊ (Advacne) रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे ही रक्कम परत करावी लागणार नाही. त्यामुळे पीएफधारकांना संकटाच्या काळात मोठी मदत होणार आहे. (EPFO 5 big decisions for PF account holders)

EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय?

1. EPFO च्या घोषणेनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना EPFO खात्यातून आगाऊ पैसे काढले होते त्यांना आता दुसऱ्यांदा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. EPFO खात्यातील 75 टक्के रक्कम किंवा मूळ वेतन व महागाई भत्ता यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे पैसे पीएफधारकांना खात्यामधून काढता येतील.

2. कोरोनाच्या काळात ज्यांची नोकरी गेली आहे, जे लोक एका महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार आहेत ते पीएफधारक आपल्या खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात.

3. EPFOच्या ईडीएलआय (EDLI scheme) योजनेतंर्गत विम्याचा लाभ सात लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पीएफधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला सात लाख रुपये मिळतील.

4. EPFO खाते आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार ईपीएफओ खात्याशी लिंक न केल्यास कंपन्यांना पीएफ खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.

5. एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडल्यानंतरही तो आपल्या ईपीएफओ खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकतो.

 

जुन्या कंपनीतून सोप्या पद्धतीने PF ट्रान्सफर करा

सगळ्यात आधी EPFO ला यूनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. इथे यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.

– लॉगइन केल्यानंतर Online Services वर जा आणि Member-One EPF Account Transfer Request ऑप्शनवर क्लिक करा.

– यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फोर्मेशन आणि पीएफ अकाऊंट वेरिफाय करावं लागेल.

– यानंतर Get Details ऑप्शनवर क्लिक करा.

– आता तुमच्याकडे ऑनलाईन क्लेम फॉर्मची पुष्टी करण्यासाठी मागील नियोक्ता आणि वर्तमान नियोक्ता यांच्या दरम्यान निवड करण्याचा पर्याय असेल. तुम्ही अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग डीएससीच्या उपलब्धतेवर आधारित हे निवडले आहे. दोन मालकांपैकी कोणतेही निवडा आणि सभासद आयडी किंवा यूएएन द्या.

– यानंतर सगळ्यात शेवटी Get OTP ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. नंतर ओटीपी सबमिट करा.

– ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस रिक्वेस्टसाठी जाईल.

– ही प्रक्रिया पुढच्या तीन दिवसांत पूर्ण होईल. सगळ्यात आधी कंपनी ती हस्तांतरित करेल. तर ईपीएफओचे फील्ड अधिकारी याची पडताळणी करतील.

ओटीपी टाकल्यानंतर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रक्रियेसाठी विनंती केली जाईल. प्रथम कंपनी पैसे हस्तांतरित करेल आणि त्यानंतर ईपीएफओचा फील्ड अधिकारी याची पडताळणी करेल. हस्तांतरण विनंती पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम स्थितीवर आपली स्थिती तपासू शकता. ऑफलाईन हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13 भरावा लागेल आणि आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल.

संबंधित बातम्या:

नोकरदारांची चिंता मिटली; EPFO ने आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली

नोकरदारासांठी मोठी बातमी, EPFO 6 कोटी खातेधारकांना ‘या’ कारणामुळे पैसे पाठणार

PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम

(EPFO 5 big decisions for PF account holders)