शत्रूचा झटक्यात खात्मा, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला मूलमंत्र काय?

आचार्य चाणक्य यांना कौटिल्य तसेच विष्णुगुप्त या नावानेही ओळखलं जात. चाणक्य यांच्या नीती तसेच त्यांनी दिलेले संदेश आजही तेवढेच महत्त्वाचे मानले जातात.

शत्रूचा झटक्यात खात्मा, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला मूलमंत्र काय?
acharya chanakya
| Edited By: | Updated on: May 15, 2025 | 7:11 PM

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना कौटिल्य तसेच विष्णुगुप्त या नावानेही ओळखलं जात. चाणक्य यांच्या नीती तसेच त्यांनी दिलेले संदेश आजही तेवढेच महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी केलेलं मार्गदर्शन फक्त प्रशासन आणि राजकारण यातच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनासाठीही फार उपयोगी पडतं. याच कारणामुळे शत्रूपासून सुटका कशी करून घ्यावी, याबाबत आचार्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय? ते जाणून घेऊ या…

सतर्क आणि सावधान राहा

चाणक्य यांनी आपल्या शत्रूला कसं पराभूत करायचं? याबाबतही सांगितलेलं आहे. कठीण काळात तुम्ही या नीतीचा उपयोग करू शकता. तुम्ही तुमच्या शत्रूला कधीच कमकुवत समजू नका. काहीही झालं तरी तुमचे नुकसान करायचे, हा तुमच्या शत्रूचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळेच तुम्ही सतर्क आणि सावधान राहिलं पाहिजे, असं आचार्य चाणक्य सांगतात.

…तर शत्रूला करता येतं पराभूत

शत्रू तुमच्यापेक्षा बलवान असेल तर त्याच्या मनासारखे वागूनच तुम्ही त्याचा पराभव करू शकता. शत्रूचे बळ हे समतूल्य असेल तर विनय तसेच बळाचा वापर करूनही त्याला पराभूत करता येऊ शकतं, असे चाणक्य सांगतात.

नेमकं काय-काय करावं?

धैर्य आणि संयम : तुम्ही शत्रूच्या फार जवळ असाल तेव्हा धैर्य आणि संयम ठेवणं गरजेचं असतं. धैर्य असेल तर योग्य निर्णय घेणे सोपे होते. तर संयमामुळे होणारे नुकसान टाळता येते.

योग्य वेळेची पाहा वाट : कोणतेही काम करण्याआधी योग्य वेळेची वाट पाहा. घाईत केलेल्या कामामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. विशेषत: तुमच्या शत्रूविरोधात तुम्ही एखादी कृती करत असाल तर योग्य वेळेची वाट पाहणे गरजेचे आहे.

कमकुवत बाजू ओळखा : तुम्हाला शत्रूला पराभूत करायचं असेल तर त्याची कमकुवत बाजू ओळखा. ही बाब समजल्यास तुम्हाला त्याला पराभूत करणं सोपं होतं.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही करत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.