अॅक्सिक्स बँक ग्राहकांनो लक्ष द्या… या 6 बँकांच्या खातेधारकांना पैसे पाठवण्याआधी करा हे काम

| Updated on: Jul 18, 2021 | 8:58 AM

आरबीआय नियमांनुसार अॅक्सिस बँकेने बँकांच्या विलीनीकरणानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, इलाहाबाद बँक, सिंडीकेट बँक, देना बँक, विजया बँकेचे आयएफएससी कोड बंद केले आहेत.

अॅक्सिक्स बँक ग्राहकांनो लक्ष द्या... या 6 बँकांच्या खातेधारकांना पैसे पाठवण्याआधी करा हे काम
LGBTQIA साठी अॅक्सिस बँकेचा नवा नियम
Follow us on

नवी दिल्ली : अलीकडेच अनेक बँकांचे दुसऱ्या बँकांमध्ये विलीनीकरण केले गेले आहे. बँकांच्या विलीनीकरणानंतर आता बँकांचे आयएफएससी कोड बदलले आहेत. नवीन बँकानुसार आता आयएफएससी कोड झाले आहेत. एक जुलैपासून विलीनीकरण झालेल्या अनेक बँकांचे आयएफएससी कोड डिऍक्टिव्ह करण्यात आले आहेत, म्हणजेच ते आता सक्रिय नाहीत. अशातच आता अॅक्सिस बँकेनेही आपल्या ग्राहकांना नोटिस जारी केली आहे. अॅक्सिस बँकेने अलर्ट जारी केला असून त्यात संबंधित बँकांच्या ग्राहकांना पैसे पाठवण्याआधी नेमके काय केले पाहिजे, याची माहिती देण्यात आली आहे. बँकेमार्फत ग्राहकांना देण्यात आलेल्या सूचनेनुसार 6 बँकांच्या ग्राहकांना पैसे पाठवण्याआधी आयएफएससी कोड तपासणे आवश्यक आहे. (Alert for Axix Bank customers, Do this before sending money to the account holders of these six banks)

अॅक्सिस बँकेचा अलर्ट काय आहे?

अॅक्सिस बँकेने आपल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, ‘आरबीआय नियमांनुसार अॅक्सिस बँकेने बँकांच्या विलीनीकरणानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, इलाहाबाद बँक, सिंडीकेट बँक, देना बँक, विजया बँकेचे आयएफएससी कोड बंद केले आहेत. या बँकांच्या बेनिफिशियल्सला डिलीट करा आणि नवीन आयएफएससी कोडसह रजिस्टर करा. याचाच अर्थ आता तुम्ही या 6 बँकामध्ये आयएफएससी कोडशिवाय पैसे पाठवू शकाल.

ग्राहकांना काय करायचे आहे?

आता ग्राहकांनी आपल्या खात्यात बेनिफिशियरी खाती पाहावीत. तसेच त्यापैकी कुणाचे खाते 6 बँकांपैकी तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी. जर असे असेल व त्या खात्यात पैसे पाठवायचे असतील तर तुम्हाला सर्वात आधी बेनीफिशिअरीच्या खात्याचा तपशील बदलावा लागेल. यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा बेनीफिशिअरी ऍड करावा लागेल आणि त्यात नवीन आयएफएससी कोड इंटर करावा लागेल. तुम्ही याची माहिती खातेधारकाकडून घेऊ शकता किंवा ऑनलाईन माध्यमातून स्वतःसुद्धा याचा पत्ता लावू शकता.

काय आहे आयएफएससी कोड?

आयएफएससी (इंडियन फायनान्स सिस्टम कोड) कोड हा 11 अंकांचा एक कोड आहे. यामध्ये अल्फाबेट आणि नंबर असे दोन्ही असतात. एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस या माध्यमातून ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करताना या कोडचा वापर केला जातो. प्रत्येक बँकेच्या शाखेचा विशेष कोड असतो. डिजिटल बँकिंगसाठी आयएफएससी कोड अत्यंत आवश्यक असतो. या कोडशिवाय ऑनलाईन व्यवहार करता येत नाही. (Alert for Axix Bank customers, Do this before sending money to the account holders of these six banks)

इतर बातम्या

नाशिक जिल्ह्यात कलम 144 लागू, पर्यटन स्थळं आणि सर्व कार्यक्रमांवर कडक निर्बंध, जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश

एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक