
देशभरात राष्ट्रीय लोकअदालतींचं आयोजन करण्यात आलं आहे. या शनिवारी तुमचं महत्त्वपूर्ण काम पूर्ण होऊ शकतं. चलन आणि इतर काही दंडाची रक्कम कमी करण्याचा तुमच्या प्रयत्नाला मोठं यश सुद्धा येऊ शकतं. देशभरात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शनिवारी 13 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात येत आहे. त्याची लागलीच नोंदवहीत नोंद करा आणि तुमचं प्रकरण या लोकअदालतीसमोर चालवण्याचे सोपास्कार लागलीच पूर्ण करा. जर तुमचा युक्तीवाद मान्य झाला तर कदाचित तुमचा दंड, चलान मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही नामी संधी सोडू नका.
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक प्रकारची प्रकरणावर सुनावणी होते. राष्ट्रीय लोकअदालतींच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केल्या जातो. वादी आणि प्रतिवादी यांच्यात सामोपचाराने तोडगा काढण्यात येतो. यामध्ये विविध प्रकराची प्रकरणं पॅनलसमोर येतात. त्यावर चर्चा होते आणि दोन्ही पक्षांना मान्य असा तोडगा काढण्यात येतो. त्याआधारे दोघांचे समाधान होते आणि न्याय पालिकेवरील प्रकरणांचा ताण कमी होतो.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये शनिवारी अनेक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोकअदालतींमध्ये प्रकरणांचा जलद निपटारा, सौहार्दपूर्ण तोडगा आणि कोर्ट फी परतफेड सुनिश्चित होते. लोकअदालतीमधील निकाल अंतिम असतो. दोन्ही पक्षांवर तो बंधनकारक असतो. या निवाड्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही.
लोकअदालतीत या प्रकरणावर सुनावणी
ट्रॅफिक चलनात मोठा दिलासा
ईटी वेल्थ ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील वकिलांनी स्वतः च्या ट्रॅफिक चलनासाठी अथवा त्यांच्या आशिलांच्या ट्रॅफिक चलनाविरोधात लोकअदालतीत दाद मागितली. अनेक उदाहरणावरून असे लक्षात आले की, ट्रॅफिक चलन आणि दंडाची रक्कम निम्याहून नाही तर 75 टक्के कमी झाली. वाहनधारकांना अवघी 25 टक्के रक्कम भरावी लागली. त्यामुळे या लोक अदालतीत तुम्ही मागे राहता कशाला? ही नामी संधी सोडू नका.