Death Insurance | सीट बेल्ट न लावल्यास, अपघातानंतर विम्यावर दावा करता येतो?

| Updated on: Sep 08, 2022 | 6:10 PM

Death Insurance | सीट बेल्ट लावलेला नसताना, अपघातानंतर विम्यावर दावा सांगता येतो का? विम्याची रक्कम मिळते का?

Death Insurance | सीट बेल्ट न लावल्यास, अपघातानंतर विम्यावर दावा करता येतो?
विमा दावा करता येतो का?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Death Insurance | सीट बेल्ट (Seat Belt) न घातल्याने रस्ते अपघातात (Road Accident) अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागतात. दरवर्षी रस्ते अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. त्यात एअर बॅग नसणे आणि सीट बेल्ट नसल्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. सीट बेल्ट लावलेला नसताना, अपघातानंतर विम्यावर (Insurance Claim) दावा सांगता येतो का? विम्याची रक्कम मिळते का? चला या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न..

मागील सीट बेल्ट

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा मुंबईजवळ पालघर जवळ अपघात झाला होता. मिस्त्री हे मागील सीट बसले होते. त्यांनी बेल्ट लावलेला नव्हता. अपघातांची मालिका तपासली असता, समोरच्या पेक्षा मागील लोकांचाच अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे मागील सीटवर बेल्ट न बांधणाऱ्यांना विमा रक्कमेत कपात (Back Seat Belt) होण्याची शक्यता आहे.

हेल्मेट गरजेचे

रस्तावर दुचाकी चालवताना सर्वांनाच हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. नियमात तसे बंधन घालण्यात आले आहे. हेल्मेट नसल्यास जीव जाण्याचा धोका वाढतो.

हे सुद्धा वाचा

सर्वांसाठी सीट बेल्ट बांधणे गरजेचे

हेल्मेट सारखेच चारचाकीत प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे. चारचाकीतील सर्वच प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य असल्याचे नियम सांगतो. अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. सीट बेल्ट नसेल तर विम्याची रक्कम कमी मिळण्याची शक्यता आहे.

नियम काय सांगतो नियम

चालक आणि समोरील सीटवर बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट बांधणे 1993 साली अनिवार्य करण्यात आले आहे. 2002 साली मागील सीटवरील प्रवाशांनाही सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे. 2019 मध्ये सरकारने सीट बेल्ट न बांधल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

इतक्या लोकांचा मृत्यू

सीट बेल्ट न बांधल्यामुळे झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू ओढावला आहे. 2018 ते 2020 या काळात 60,500 अपघात झाले. त्यातील 50 टक्के प्रकरणात मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसल्याचे समोर आले.

विम्याच्या रक्कमेसाठी न्यायालयात धाव

मोटार अपघातात विमा दावा करताना कंपन्या सीट बेल्ट बांधला नसल्यास विमा दावा फेटाळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विमा मिळावा यासाठी अनेक जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचा समोर आले आहे.