Insurance Loan | केवळ संरक्षणचं नाही, विम्यावर कर्जही मिळवा, प्रक्रिया आहे अगदी सोपी

Insurance Loan | विमा केवळ अडीअडचणीतच उपयोगी पडतो असे नाही. अपघात झाला. मृत्यू झाला तर विम्याची रक्कम कुटुंबियांना उपयोगी पडतेच. पण अचानक पैशांची निकड पडली तर, विमा कर्जही मिळवून देऊ शकतो. विमा कंपन्या 9 ते 10 टक्के व्याज दराने कर्ज देतात.

Insurance Loan | केवळ संरक्षणचं नाही, विम्यावर कर्जही मिळवा, प्रक्रिया आहे अगदी सोपी
विम्यावर कर्जाची सुविधाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 2:03 PM

Insurance Loan | विमा केवळ अडीअडचणीतच उपयोगी पडतो असे नाही. अपघात झाला. मृत्यू झाला तर विम्याची रक्कम कुटुंबियांना उपयोगी पडतेच. पण अचानक पैशांची निकड पडली तर, विमा कर्जही (Insurance Loan) मिळवून देऊ शकतो. त्यामुळे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याची गरज नाही, वा क्रेडिट कार्डची (Credit Card) ही गरज नाही. तुमच्या विमा पॉलिसीवरही कर्ज मिळवता येते. हे कर्ज किफायतशीर आणि स्वस्तात मिळते. या कर्जावरील व्याजदर सावकारी पद्धतीचा नसतो. अनेक बँका आणि पतसंस्था दामदुप्पट किंमतीने व्याज आकारतात. विमा पॉलिसीवर कर्ज मिळणे पहिल्या इतके किचकट राहिले नाही. अत्यंत निकड असेल तर विमा योजना तुमच्या मदतीला धावून येईल. काही सोप्या पद्धतीने तुम्ही या कर्जासाठी अर्ज करु शकता. त्यासाठी तुमची विमा पॉलिसी आणि इतर काही कागदपत्रे (Documents)आवश्यक आहे.

विमा योजनेवर कर्ज मिळवण्यासाठी आता किचकट प्रक्रिया राबविल्या जात नाही. सोप्या आणि किफायतशीर पद्धतीने तुम्हाला विमावर कर्ज मिळवता येतो. कर्ज घेताना काय प्रक्रिया करावी लागते याची माहिती घेऊयात..

किती दिवसात खात्यात जमा होईल रक्कम?

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही दिवसातच रक्कम खात्यात जमा होईल. हा कालावधी कमी अधिक असतो. कर्जाची परतफेड ही विम्याच्या कालावधीवर अवलंबून असते. जर तुम्ही दीर्घकालीन विमा पॉलिसीत गुंतवणूक केली असेल तर त्यानुसार विम्याची परतफेड करता येईल. मुदतपूर्व कालावधीत तुम्हाला कर्जाची रक्कम फेडावी लागेल. कर्जाचा हप्ता चुकला, थकला तर व्याजाची रक्कम तुमच्या मूळ कर्ज रक्कमेत जोडण्यात येते. त्यानंतर विमा पॉलिसी मॅच्युअर झाली तर ही रक्कम वसूल करण्यात येते. तुमची विमा पॉलिसी बंद करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

90 टक्क्यांपर्यंत मिळेल कर्ज

विमा कंपन्या एकूण विमा पॉलिसीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. विमा पॉलिसीच्या प्रकारानुसार ही टक्केवारी कमी जास्त होते. युलिप, शॉर्ट टर्म आणि इतर विमा पॉलिसीवर धोरणांनुसार कर्ज रक्कम मिळते. समर्पण मूल्यावर कर्ज रक्कम अवलंबून असते. केवळ मुदत विम्यावर कर्ज मिळत नाही, असा कंपन्यांचा नियम आहे. त्यामुळे अशा पॉलिसीधारकांनी नाहक कंपन्यांच्या गळ्यात पडणे टाळावे. इतरांना त्यांच्या विमा पॉलिसीच्या प्रकारानुसार कर्ज रक्कम मिळते.

मग व्याज किती द्यावे लागेल?

बँकिग अथवा वित्तीय संस्थांपेक्षा सलवतीत कर्ज मिळते. साधारणतः 9 ते 10 टक्के दरानं कर्ज मिळते. खासगी बँका, पतसंस्थांचे कर्जावरील व्याजदर 12-18 टक्क्यांपर्यंत असतो. प्रक्रिया शुल्क, छुपे शुल्क यामुळे तुम्हाला हे कर्ज फार महागात पडते. त्यामानाने विम्यावर घेतलेले कर्ज स्वस्त असते.

असे मिळवा कर्ज

विम्यावर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज भरावा लागतो. हा अर्ज तुम्ही संबंधित विमा कंपनीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकता. डाऊनलोड झाल्यावर त्याची प्रिंट आऊट काढा. हा अर्ज भरून द्या. या अर्जात तुम्ही घेतलेल्या पॉलिसीचा तपशील द्या. किती कर्ज हवे आहे, त्याची रक्कम टाका. त्यानंतर हा अर्ज तुमच्या नजीकच्या विमा शाखेत जमा करा. तुमच्या विमा एजंटच्या मदतीनेही तुम्ही अर्ज भरू शकता. त्याच्या सहायाने अर्ज भरताना चूका टळतील.

आता विमा कंपन्यांनी कर्ज देण्यासाठी ऑनलाईन सुविधाही सुरु केली आहे. विमा कंपनीच्या अॅपवर वा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता. काही कागदपत्रे जमा करुन ऑनलाईन कर्जाचा अर्ज जमा करता येईल. ही रक्कम थेट तुम्ही दिलेल्या बँक खात्यात जमा होते.

विमा कंपन्या कर्ज देण्याचा अर्ज तयार करतात. हा कर्ज अर्ज भरल्यानंतर तो नजीकच्या शाखेत जमा करावा लागेल. अधिकारी तुम्हाला पुढील प्रक्रिया समजावून सांगतील आणि लवकरात लवकर ही रक्कम खात्यात जमा होईल.

Non Stop LIVE Update
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.