तुमच्या आधार कार्डाचा वापर कुठे केला जातोय, जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Oct 25, 2021 | 12:27 PM

Aadhaar Card | जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता. वास्तविक, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), आधार क्रमांक जारी करणारी संस्था, तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तपासण्यासाठी ही सुविधा पुरवते.

तुमच्या आधार कार्डाचा वापर कुठे केला जातोय, जाणून घ्या एका क्लिकवर
आधारकार्ड
Follow us on

मुंबई: सध्याच्या काळात अगदी सीमकार्ड, रेशनकार्डपासून ते जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. त्यामुळे आधार कार्डाच्याबाबतीत (Aadhaar Card) कोणताही गैरप्रकार होणे परवडणारे नसते.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता. वास्तविक, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), आधार क्रमांक जारी करणारी संस्था, तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तपासण्यासाठी ही सुविधा पुरवते.

आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री कशी चेक कराल?

* सर्वप्रथम, तुम्ही आधार क्रमांक जारी करणाऱ्या UIDAI (UIDAI) च्या https://resident.uidai.gov.in. अधिकृत संकेतस्थळावर जा.

* त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री या पर्यायावर क्लिक करा.
* आता तुमचा आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाका.
* त्यानंतर ‘जनरेट ओटीपी’ वर क्लिक करा
* ओटीपी टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि व्यवहारांची संख्या द्यावी लागेल.
* आता निवडलेल्या कालावधीसाठी ऑथेंटिकेशन रिक्वेस्टचे तपशील स्क्रीनवर दिसून येतील.

तुम्हाला तुमच्या आधारच्या वापरामध्ये काही गैरवापर झाल्याचा संशय असल्यास किंवा काही अनियमितता आढळल्यास, तुम्ही ताबडतोब UIDAI टोल फ्री नंबर – 1947 वर किंवा help@uidai.gov.in येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.

बनावट आणि खऱ्या आधार कार्डामधील फरक कसा ओळखाल?

आधार कार्डाची पडताळणी कशी कराल?

* सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा.
* पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
* त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
* यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा.
* तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या.
* याशिवाय, तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

मास्क्ड आधारकार्ड म्हणजे काय?

eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता. मास्क्ड आधार कार्डावर केवळ शेवटचे चार क्रमांक दिसतात. तुम्ही हव्या त्या प्रकारे आधारकार्ड डाऊनलोड करु शकता.

इतर बातम्या : 

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?

लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स

मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी