UPI Rupay Credit Card | युपीआयला क्रेडिट कार्डचे पंख, रुपे क्रेडिट कार्ड लवकरच दिमतीला, क्युआर कोड स्कॅनमुळे झटपट व्यवहार

UPI Rupay Credit Card | NPCI लवकरच रुपे क्रेडिट कार्ड घेऊन येत आहे. या क्रेडिट कार्डच्या मदतीने QR कोड स्कॅन करून UPI ​​द्वारे पेमेंट करता येणार आहे.

UPI Rupay Credit Card | युपीआयला क्रेडिट कार्डचे पंख, रुपे क्रेडिट कार्ड लवकरच दिमतीला, क्युआर कोड स्कॅनमुळे झटपट व्यवहार
Rupay Credit CardImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:51 PM

UPI Rupay Credit Card News |  Rupay क्रेडिट कार्डच्या मदतीने आता तुम्हाला UPI व्यवहारही करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची जून महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत क्रेडिट कार्डच्या मदतीने UPI व्यवहारही करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी वेगाने काम सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय देयके महामंडळाच्या (National Payment corporation of India-NPCI) Rupay क्रेडिट कार्डच्या मदतीने QR कोड स्कॅन करून व्यवहार करता येणार आहे. त्याला परवानगी मिळण्यासाठी अनेक बँकांशी चर्चा करत आहे. छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना MDR शुल्कात सूट देण्याचाही विचार केला जात आहे. व्यवहारासाठी बँका मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) व्यापाऱ्याकडून शुल्करुपात आकारतात. MDR हे व्यवहाराच्या 2-3 टक्क्यांपर्यंत असू शकते. सध्या देशभरात 2-3 दशलक्ष व्यापारी क्रेडिट कार्ड पेमेंट घेतात. यूपीआयच्या मदतीने पेमेंट प्राप्त करणारे 50 दशलक्ष आहेत. UPI च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी कोणतेही MDR शुल्क नाही. NPCI छोट्या दुकानदारांना या शुल्कातून दिलासा देण्याचा विचार करत आहे.

विविध प्रकारच्या व्यवहारांवर लक्ष

NPCI चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO दिलीप आसबे यांनी याविषयीची माहिती दिली. दररोज होणाऱ्या विविध प्रकारच्या कोट्यवधी व्यवहारांवर NPCI लक्ष केंद्रित करत आहोत. संपर्करहित व्यवहारांसाठी कार्ड टोकनीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय पार्किंगची सुविधा टोल वसुली फास्टॅग कार्डमध्ये जोडण्याचा विचार केला जात आहे. याशिवाय पेट्रोल पंपावरील व्यवहारांचाही समावेश करण्याचा विचार सुरू आहे.

अनेक बँका इच्छुक

गेल्या आठवड्यात, दिलीप असबे यांनी या कार्डची अपडेट माहिती दिली होती. पुढील दोन महिन्यांत Rupay क्रेडिट कार्डच्या मदतीने UPI पेमेंट देखील करणे शक्य होईल. अनेक बँकांनी यात रस दाखवल्याचे त्यांनी सांगितले.  NPCI प्रथम यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल, त्यानंतर ती मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवली जाईल. एसबीआय कार्ड्स, बँक ऑफ बडोदा कार्ड्स, अॅक्सिस बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी या योजनेत रस दाखवला आहे.

हे सुद्धा वाचा

क्रेडिट कार्डवर 2-3% पर्यंत MDR चार्ज

सध्या देशभरात 2-3 दशलक्ष व्यापारी क्रेडिट कार्ड पेमेंट घेतात. यूपीआयच्या मदतीने पेमेंट प्राप्त करणारे 50 दशलक्ष आहेत. UPI च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी कोणतेही MDR शुल्क नाही. डेबिट कार्ड पेमेंटवरही व्यवहार मूल्याच्या 0.90 टक्क्यांपर्यंत MDR शुल्क आकारले जाते. हे त्याचे कमाल कॅपिंग आहे. त्याच वेळी, क्रेडिट कार्डसह व्यवहारांसाठी 2-3 टक्क्यांपर्यंत व्यापाऱ्यांना सूट मिळू शकते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.