रेल्वेची ‘सॅलरी एक्स्प्रेस’ सुसाट! 34% डीएची रक्कम खात्यात कधी जमा होणार? उत्तर मिळालंय!

| Updated on: Apr 06, 2022 | 7:04 PM

Railway Employee DA : केंद्राच्या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागांना दिले आहेत. त्यामुळे वेतनातील फरकासह सुधारित दराने महागाई भत्ता (DA) कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.

रेल्वेची सॅलरी एक्स्प्रेस सुसाट! 34% डीएची रक्कम खात्यात कधी जमा होणार? उत्तर मिळालंय!
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे लाखो कर्मचारी (RAILWAY WORKER) आणि निवृत्तीवेतन धारकांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारी (CENTRL GOVERNMENT) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता तीन टक्क्यांच्या वाढीसह 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्राच्या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागांना दिले आहेत. त्यामुळे वेतनातील फरकासह सुधारित दराने महागाई भत्ता (DA) कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं बंपर गिफ्ट मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांच्या सुधारित महागाई भत्त्यानुसार फरक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाचा देशातील 14 लाख रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना थेट लाभ होणार आहे. एप्रिलच्या वेतनात 34 टक्के महागाई भत्त्यासह वेतन अदा केले जाईल.

तारीख ठरली!

देशभरातील 14 लाख कर्मचाऱ्यांना जानेवारी-मार्च तीन महिन्यांच्या महागाई भत्त्यांतील फरकहाी मिळणार आहे. रेल्वे महामंडळाचे उप-निदेशक जय कुमार जी यांनी सर्व विभागाला निर्देशाचं पत्र जारी केलं आहे. ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा यांनी येत्या महिन्यांतच महागाई भत्त्याचा फरक मिळणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे 34 टक्क्यांनुसार सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अदा 30 एप्रिल पर्यंत केला जाण्याची शक्यता आहे.

किमान मूळ वेतनात वाढ

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ अपेक्षित आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. आतापर्यंत 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 5580 रुपये वेतनात जमा होत होते. डीए रकमेत 34 टक्के वाढीमुळे मूळ वेतनात 6120 रुपयांची प्रति महिना वाढ होईल. प्रति महिना 540 रुपयांची वाढ होईल. वार्षिक आधारावर विचार करता 6480 रुपयांची वाढ अपेक्षित असेल.

कमाल मूळ वेतनात वाढ

रेल्वे कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये आहे. 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 17,639 रुपयांचा डीए प्रति महिना प्राप्त होईल. जर 34 टक्क्यांनुसार विचार केल्यास प्रतिमाह 19346 रुपये वाढ दिसून येईल. वार्षिक आधारावर कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20,484 रुपयांची वाढ अपेक्षित असेल.

संबंधित बातम्या :

TAX SAVING TIPS: पगारवाढीचं सेलिब्रेशन, इन्कम टॅक्सचं ‘नो टेन्शन’! वाचा- कर बचतीचा कानमंत्र

गाडीत पेट्रोल टाकू की गाडीवर ! दरवाढीने महागाईचा आगडोंब, चांद्यापासून बाद्यांपर्यंत इंधन दरवाढीने वातावरण कमालीचे तापले

एलआयसी आयपीओचा अखेर मुहूर्त लागला, मे महिन्यातील ‘या’ तारखेला येणार IPO, केंद्र 7 टक्के भागीदारी विकणार?