दोन हजारांच्या नोटांना पसंती कमी; व्यवहारात 500 रुपयाच्या नोटेची ‘हवा’

चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 500 रुपये आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा एकत्रितपणे 87.1% होता, त्यात 500 रुपयाच्या नोटेचा वाटा सर्वाधिक 34.9% इतका होता.

दोन हजारांच्या नोटांना पसंती कमी; व्यवहारात 500 रुपयाच्या नोटेची 'हवा'
rupees note
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 4:04 PM

भारतात डिजिटल व्यवहार (digital transactions) रेकॉर्ड स्तरावर असले तरी आणि युपीआय पेमेंटला प्राधान्य आणि पसंती मिळत असली तरीही देशात रोखीच्या व्यवहारांचा (Cash Transaction) धडाका सुरूच आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये चलनातील नोटांचे  मूल्य 9.9 टक्क्यांनी वाढून 31 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी 16.8% होते. बँकर्सच्या मते, पेमेंटमध्ये डिजिटल व्यवहारांचा वाटा वाढत असल्याने बँक नोटांची मागणी व्यवहारांऐवजी त्याचा साठा करण्यासाठी वाढलेली आहे. जास्त मूल्याच्या नोटांच्या मागणीचा अर्थ असा होता की, 10 रुपये आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची संख्या कमी झाल्याने नोटांचे प्रमाण केवळ 5% वाढले. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीचे व्यवहार जात असल्याचे हे आणखी एक द्योतक आहे. याचा अर्थ डिजिटल पेमेंट मध्ये वाढ झाली असली तरी कमी मुल्यांचे व्यवहार यामाध्यमातून वाढले आहेत. अगदी नाण्यांची मागणीदेखील (indent) आर्थिक वर्ष 2021 मधील 300 कोटींवरून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 80 कोटींवर घसरली आहे.

मूल्याच्या दृष्टीने, यावर्षी 31 मार्चपर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 500 रुपये आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा एकत्रितपणे 87.1% होता, जो 31 मार्च 2021 पर्यंत 85.7% होता. एक गठ्ठा विचार करता, 500 रुपये मूल्याचा वाटा सर्वाधिक 34.9% होता, त्यानंतर 10 रुपयांच्या नोटांचा क्रमांक लागतो, जो 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांच्या 21.3% होता.

बनावट नोटांच्या  संख्येत वाढ

आर्थिक वर्ष 2022 मध्ये सापडलेल्या बनावट नोटांच्या (fake currency) संख्येत वाढ झाली असून आर्थिक वर्ष 2021 मध्ये 2 लाखांच्या तुलनेत यंदा 2.3 लाख बनावट नोटा सापडल्या आहेत. 500 रुपये मुल्यांच्या (denomination) बनावट नोटांची संख्या मागील वर्षीच्या 39,453 वरून दुपटीने वाढून 79,699 वर पोहोचली आहे. आरबीआयने वर्षभरात नोटांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, 100 रुपयांच्या नोटेला सर्वात जास्त पसंती मिळाली, तर 2,000 रुपयांच्या नोटेला सर्वात कमी पसंती मिळाली. नाण्यांमध्ये, 5 रुपयांला सर्वाधिक पसंती होती, तर 1 रुपयाला सर्वात कमी पसंती होती.

हे सुद्धा वाचा

500 आणि 2000च्या 87 टक्के नोटा बनावट

31 मार्च 2022 पर्यंत बँकेत जमा करण्यात आलेल्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांपैकी 87.1 टकके नोटा या बनावट असल्याची धक्कादायक माहिती दस्तूरखुद्द रिझर्व्ह बंकेने दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत हा आकडा 85.7 टक्के इतका होता. 31 मार्च 2022चा विचार केला तर एकूण चलनात हा आकडा 21.3 टक्के इतका मोठा आहे. म्हणजे चलनात असलेल्या 21.3 टक्के नोटा या बनावट आहेत .इतर नोटांचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 रुपयांच्या खोट्या नोटा 16.4 टक्के तर 20 रुपयांच्या खोट्या नोटांच्या प्रमाणात 16.5 टक्के वाढल्या आहेत. यासह 200 रुपयांच्या खोट्या नोटांच्या संख्येत 11.7 टक्के वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यावर्षात 50 रुपयांच्या खोट्या नोटा 28.7 टक्के तर 100 रुपयांच्या खोट्या नोटा 16.7 टक्क्यांवी कमी झाल्या आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.