तुम्ही आयटीआर भरलात का?; जाणून घ्या आयटीआर भरण्याचे ‘हे’ महत्त्वपूर्ण फायदे

| Updated on: Dec 28, 2021 | 6:15 AM

आर्थिक वर्ष 2020-21 वर्षासाठीचा आयटीआर भरण्यासाठी 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत आहे. जर तुमचे इनकम हे 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे. नियमितपणे आयटीआर भरणाऱ्यांना अनेक फायदे मिळतात तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही आयटीआर भरलात का?; जाणून घ्या आयटीआर भरण्याचे हे महत्त्वपूर्ण फायदे
Follow us on

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21 वर्षासाठीचा आयटीआर भरण्यासाठी 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत आहे. जर तुमचे इनकम हे 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे दिलेल्या मुदतीमध्ये आयटीआर भरणे शक्य झाले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू  शकतो. आयटीआर भरण्याचे काही फायदे आहेत. हे फायदेच आपण आज जाणून घेणार आहोत.

बँकेतून लोन मिळण्यासाठी

जर तुम्हाला एखाद्या बँकेतून लोन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे आयटीआर मागितला जातो, हा आयटीआर तुमच्या कमाईचा पुरावा असतो. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याचा अंदाज बँकांना येतो आणि त्याच आधारावर तुमच्या लोनची रक्कम ठरवली जाते. तुम्ही जर नियमीतपणे आयटीआर भरत असाल तर तुम्हाला कुठल्याही बँकेकडून सहज लोन मिळू शकते.

विमा पॉलिसीची रक्कम वाढवण्याासठी

तुम्हाला जर तुमच्या विमा पॉलिसीची रक्कम वाढवायची असेल तर तुमच्याकडे आयटीआरची मागणी होते. समजा तुम्हाला जर तुमच्या विमा पॉलिसीचे कव्हर एक कोटीपर्यंत वाढवायचे आहे, तर अशा स्थितीमध्ये विमा अधिकारी तुमच्याकडे आयटीआरची मागणी करतात. यामधून तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत काय काय आहेत? तुम्ही विम्याची रक्कम भरण्यासाठी सक्षम आहात का हे पाहीले जाते.

पासपोर्ट आणि व्हिसा बनवण्यासाठी 

पासपोर्ट आणि व्हिसा बनवण्यासाठी अ‍ॅड्रेस प्रूफची आवश्यकता असते. तुम्ही जर नियमीतपणे आयटीआर भरत असाल तर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्नची ती प्रत अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून सादर करू शकता. तुम्हाला पासपोर्ट तातडीने मिळू शकतो. तसेच तुम्हाला जर परदेशात जायचे असेल तर व्हिसाची आवश्यकता असते. आयटीआरची प्रत सादर केल्यास तुम्हाला व्हिसा देखील मिळतो. तसेच तुम्हाला एखादे सरकारी कंत्राट हवे असेल तर तिथे देखील आयटीआरची आवश्यकता असते.

संबंधित बातम्या 

नववर्षाच्या स्वागताला काश्मीरला जायचंय?, चिंता सोडा पटापट बॅग भरा, आयआरसीटीसीकडून मिळतीये खास ऑफर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 400 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे