Dolo 650 : कोरोनाच्या लसी इतकीचं डोलो-650 ची चर्चा, कंपनीनं काय प्लॅनिंग केलं, मायक्रो लॅब्सचे MD म्हणाले…

| Updated on: Jan 23, 2022 | 1:29 PM

कोरोना संसर्गाच्या काळात सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या (Covaxin ) लसीची सर्वाधिक चर्चा होती. याशिवाय एका औषधाची चर्चा लोकांमध्ये होती. त्या औषधाचं नाव डोलो-650 (Dolo 650) हे आहे.

Dolo 650 : कोरोनाच्या लसी इतकीचं डोलो-650 ची चर्चा, कंपनीनं काय प्लॅनिंग केलं, मायक्रो लॅब्सचे MD म्हणाले...
दिलीप सुराना
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या काळात सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या (Covaxin ) लसीची सर्वाधिक चर्चा होती. याशिवाय एका औषधाची चर्चा लोकांमध्ये होती. त्या औषधाचं नाव डोलो-650 (Dolo 650) हे आहे. या गोळीचं नावं प्रत्येक कोरोना रुग्णाला देण्यात येणाऱ्या औषधाच्या चिठ्ठीमध्ये पाहायला मिळतं. डोलो-650 गोळीचं कॉम्बिनेशन हे पॅरासिटामोल (Paracetamol) असून वेदनाशामक म्हणून ते काम करतं. कोरोना संसर्गाच्या काळात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीइतकीचं प्रसिध्दी डोलो 650 या गोळीनं मिळवले आहे. या गोळीची निर्मिती मायक्रो लॅब्स कंपनीतर्फे करण्यात येते. हे औषध माईल्ड अनालजेसिक म्हणजे वेदनाशामक आणि अँटीपायरेटिक म्हणजे तापनाशक आहे. मायक्रो लॅब्सचे एमडी दिलीप सुराना यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दिलीप सुराना गेल्या तीस वर्षांपासून औषध निर्मितीच्या व्यवसायात आहेत. दिलीप सुराना यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुळाखतीत डोलो 650 लोकप्रिय होण्यामागील कारणं सांगितलं आहे.

औषधाला लोकप्रियता कशी मिळाली?

दिलीप सुराना यांनी बाजारात पॅरासिटामोलच्या 500 एमजीच्या गोळ्या उपलब्ध होत्या. अनेक कंपन्या पाचशे एमजीच्या गोळ्या तयार करत आणि विक्री करत होत्या. मात्र, आम्ही पाचशे एमचीज्या गोळीला वेगळ्या स्वरुपात आणि त्याची क्षमता वाढवत बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. 650 एमजी केल्यानं डोलो गोळी तापशामक आणि वेदनाशामक अशी कामं करु लागली, असं सुराना म्हणाले.

डोलो 650 लोकांपर्यंत कशी पोहोचली

दिलीप सुराना यांनी डोलो 650 गेल्या काही वर्षांपासून बाजारात उपलब्ध असल्याचं सांगितलं. मात्र, अलीकडच्या काळात लोकप्रियता मिळाल्याचं यांनी स्पष्ट केलं. तापन आणि अंगुदखी ही कोरोनाची प्रमुख लक्षणं आहेत. त्यावर डोलो 650 हे चांगलं औषध असू शकतं. कोरोनाच्या काळात लोकं क्वारंटाईन होते. त्यावेळी डॉक्टर रुग्णांना पाहू शकत नव्हते. त्यावेळी डोलो 650 हे नाव व्हाटसअप, एसएमएस आणि वॉईस मेसेज वरुन प्रसारित झालं.

कंपनीची रणनिती

दिलीप सुराना यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या जनजागृतीच्या कामाचा फायदा झाला असल्याचं सांगितल. कोरोना लसीकरणाच्या ठिकाणी मायक्रोलॅब्सनं सातत्यानं लसीकरण केंद्रांवर काय करावं काय करु नये अशा आशयाचे बोर्ड लावत राहिलं. त्या बोर्डवर डोलोचं नाव होत. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरण केंद्रावंरजाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना डोलो 650 बद्दल माहिती दिली. कोरोना लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डोलो-650,मास्क आणि सॅनिटायझर दिले. कोरोना लस घेतल्यावर ताप आल्यास डोलो 650 गोळी घेण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्याचा फायदा झाल्याचं सुराना म्हणाले.

इतर बातम्या:

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा फटका ठरलेला

सावधान! एक SMS रिकामे करु शकतो तुमचे खाते, वेबसाइट स्मिशींगपासून सावध रहा

Dolo 650 mg tablet how get popularity amid covid pandemic and corona vaccination told buy Dilip Surana of Micro Labs