AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, राजधानी इस्लामाबादवर मोठा हल्ला, काही कळायच्या आतच…

मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं आहे, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले झाल्याची बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, राजधानी इस्लामाबादवर मोठा हल्ला, काही कळायच्या आतच...
Shehbaz SharifImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 9:27 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर मोठा ड्रोन हल्ला झाला आहे. इस्लामाबादच्या फैजाबाद आणि आय 8 परिसरामध्ये दोन ड्रोनने हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. घटनेनंतर तातडीनं इस्लामाबादचं एअरस्पेस बंद करण्यात आलं आहे. या हल्लानंतर पाकिस्तानचं हवाई दल अलर्ट मोडमध्ये आलं असून, इस्लामाबाद परिसरात एअरफोर्सच्या विमानानं टेहळणी सुरू आहे. इस्लामाबादवर हल्ला झाल्यामुळे खबरदारी म्हणून इस्लामाबाद एअरपोर्टवर लँड होणाऱ्या विमानांना इतर ठिकाणी वळवण्यात आलं आहे. दरम्यान फैजाबाद आणि आय 8 नंतर आय 9 सेक्टर आणि शमशाबाद परिसरात देखील मोठा ड्रोन हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर परिसराला भीषण आग लागली आहे. हे ड्रोन हल्ले नेमके कोणी केले? हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र अफगाणिस्तानकडून हे ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताने पाकिस्तानला ड्रोन हल्ल्यांची धमकी दिली होती. या हल्यामुळे आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.

तर दुसरीकडे त्यापूर्वी अफगाणिस्तानच्या एका फ्यूल डेपोवर जोरदार हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. कंधार एअरपोर्टजवळ असलेल्या फ्यूल डेपोवर हा हल्ला झाला आहे. पाकिस्तानने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सरकारने केला आहे. यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. त्यानंतर काही वेळातच पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला.

अफगाणिस्ताने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून कंधार एअरपोर्टजवळ असलेल्या फ्यूल डेपोवर हल्ला करण्यात आला आहे. या फ्यूल डेपोमधून अनेक खासगी विमानांना तसेच अन्य संस्थांना देखील इंधनाचा पुरवठा केला जातो. या इंधन डेपोवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रचंड नुकसान झालं असून, इंधन पुरवठा खंडित झाला आहे. फ्यूल डेपोचे व्यवस्थापक हाजी दाद मोहम्मद यांनी झालेल्या नुकसानाबाबद माहिती देताना सांगितलं की, या हल्ल्यामुळे या फ्यूल डेपोचं मोठं नुकसान झालं असून, तब्बल 1500 टनापेक्षा अधिक इंधन नष्ट झालं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल