AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून अमेरिकेवर सर्वात मोठा हल्ला, थेट अणुतळ उडवलं, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली

USA vs Iran : इराण सतत अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करत आहे. आता इराणकडून अमेरिकेच्या अणु तळाजवळ मोठा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

इराणकडून अमेरिकेवर सर्वात मोठा हल्ला, थेट अणुतळ उडवलं, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली
Attack on Nuclear baseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 13, 2026 | 9:15 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र दोन्ही बाजूंनी सतत हल्ले सुरू आहेत. इराण सतत अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करत आहे. आता इराणकडून अमेरिकेच्या अणु तळाजवळ मोठा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणने इन्किर्लिक एअर बेस (तुर्किये) वर क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली असून या संदर्भात इराणशी संपर्क सुरू असल्याचेही सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेच्या अणु तळावर इराणचा हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेच्या तुर्कीमधील अणु तळावर हल्ला केला आहे. त्याचबरोबर अमेरिकन विमानवाहू नौकेवरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने असा दावा केला आहे की, त्यांनी USS अब्राहन लिंकनवर हल्ला केला आहे. गल्फ ऑफ ओमानमध्ये हा हल्ला झाल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे. IRGC च्या मते हल्ल्यानंतर अब्राहम लिंकन मागे हटले आहे, मात्र अमेरिकेने हा हल्ला झाल्याचे नाकारले आहे.

नाटोच्या ठिकाणांवर हल्ले

इराणने एकाच वेळी तीन NATO ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. दुबईवरही मोठा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. इराणच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची एअर डिफेन्स प्रणाली युरोपमधून मध्य-पूर्वेत पाठवण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल कारवाईत इराणची एक बॅलिस्टिक मिसाइल मेडिटेरिनियन समुद्राच्या परिसरात नष्ट करण्यात आली असून NATO च्या एअर डिफेन्स सिस्टमने ती मिसाइल पाडली असल्याचे बोलले जात आहे.

इन्सर्लिक बेसवर अमेरिकेची टॅक्टिकल अण्वस्त्रे

समोर आलेल्या माहितीनुसार, नाटोची ही मिसाईल इन्सर्लिक एअरबेसच्या दिशेने जात होती. या तळावर अमेरिकेची टॅक्टिकल अण्वस्त्रे असल्याचे बोलले जात आहे. पूर्व भूमध्य समुद्रात NATO च्या एअर डिफेन्स प्रणालीने ही मिसाइल रोखली. तसेच इराण समर्थित PMF च्या तळांवरही हल्ले झाल्याची माहिती समोर आले आहे. तसेच इराकमध्ये अमेरिकेवर लुकास ड्रोनद्वारे हल्ला झाल्याचेही समोर आले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल