ई-श्रम पोर्टलवर फोटो अपडेट कसा कराल, जाणून घ्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया

E Shram Portal | ई-श्रम पोर्टलवर सहा कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा हा पहिला पद्धतशीरपणे एकत्रित केलेला राष्ट्रीय डेटा आहे. पोर्टलवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी नोंदणी केली आहे.

ई-श्रम पोर्टलवर फोटो अपडेट कसा कराल, जाणून घ्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 12:58 PM

नवी दिल्ली: केंद्राने एक ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे, जे त्यांच्या आधार कार्डशी जोडले जाईल. eSHRAM पोर्टलवर फोटो अपडेट करण्यासाठी नोंदणीच्या वेळी, फोटो आधार सेवांमधून घेतलेला आहे, त्यामुळे फोटो अपडेट करण्याची तरतूद उपलब्ध नाही. जर कामगाराने आधार कार्डच्या फोटोमध्ये बदल केले तर ते आधार ऑथेंटिकेशननंतर आपोआप ई-श्रम पोर्टलवर दिसून येईल.

ई-श्रम पोर्टलवर सहा कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा हा पहिला पद्धतशीरपणे एकत्रित केलेला राष्ट्रीय डेटा आहे. पोर्टलवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी नोंदणी केली आहे.

e-Shram पोर्टलमुळे कामगारांना काय फायदा?

ई-श्रम पोर्टलमुळे संबंधित कामगारांना आता देशात कुठेही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत कामगाराला 2 लाख रुपयांचा विनामूल्य अपघाती विमा मिळतो. असंघटित क्षेत्रातील कामगारांचा हा देशातील पहिला राष्ट्रीय डेटाबेस आहे. मंत्रालयाच्या मते, विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. यामध्ये बांधकाम, परिधान उत्पादन, मासेमारी, किरकोळ विक्री, घरगुती काम, शेती आणि संबंधित वर्ग, वाहतूक क्षेत्र इत्यादी असंघटित कामगारांचा समावेश आहे.

देशातील 38 कोटी कामगारांचा फायदा

ई-श्रम पोर्टल देशातील 38 कोटीहून अधिक असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करेल. त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांच्या वितरणासाठी मदत करेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले होते.

राष्ट्रीय टोल क्रमांक

ज्या कामगारांना पोर्टलवर नोंदणी करायची आहे त्यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक – 14434 जारी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना एकत्र करणे आहे. पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती राज्य सरकारांच्या विभागांसोबतही शेअर केली जाईल. हे पोर्टल बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, प्लॅटफॉर्म कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरगुती कामगार, कृषी कामगार, दूग्ध व्यावसायिक, मच्छीमार, ट्रक चालकांसह सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करेल.

संबंधित बातम्या:

E-Shram Card: ‘या’ लोकांनी त्यांचे ई-श्रम कार्ड बनवले पाहिजे, अनेक फायदे मिळणार

PHOTO | वाईट काळातही उपयुक्त ठरेल तुमचे ई-श्रम कार्ड, मिळतील लाखोंचे फायदे

असंघटित क्षेत्रातील मजुरांना अडीअडचणीच्या काळात मिळणार हक्काची मदत