Fact Check | कसलं काय राव..ही योजना सरकारी नाहीच..चुकूनही वैयक्तिक माहिती देऊ नका, नाही तर गोत्यातच याल..

| Updated on: Sep 11, 2022 | 2:07 PM

Fact Check | 'प्रधानमंत्री ज्ञानवीर' या योजनेपासून तरुणांनी सावध रहावे. केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना आणलेली नाही. या वेबसाईटवर जाऊन तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.

Fact Check | कसलं काय राव..ही योजना सरकारी नाहीच..चुकूनही वैयक्तिक माहिती देऊ नका, नाही तर गोत्यातच याल..
सावध असा, सावज होऊ नका
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Fact Check | ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) अनेक प्रकार आहेत. तरुणांना लक्ष्य करत एक बोगस योजना इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. थेट देशाच्या पंतप्रधानांच्या (Prime Minister) नावे ही योजना असल्याचे भासवत तरुणांना जाळ्यात ओढण्यात येते आणि त्यांच्याकडून पैसा उकळण्यात येत आहे. या फसव्या योजनेत तुम्ही अडकू नका, असे आवाहन केंद्र सरकारने (Central Government) केले आहे. याविषयीचा हा फॅक्ट चेक..

प्रधानमंत्री ज्ञानवीर योजना

केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, प्रधानमंत्री ज्ञानवीर योजना ही सरकारची योजना नाही. ती तरुणांना फसवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. तरुणांनी त्यांच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सायबर भामट्यांनी लूट करण्यासाठी ही योजना आणली आहे.

हे सुद्धा वाचा

दरमहा मिळणार 3,400 रुपये

समाज माध्यमांवर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेत नाव नोंदणी केल्यास तरुणांना दर महिन्याला सरकार 3,400 रुपये मदत करणार असल्याचा दावा या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.

हा तर भास

या योजनेच्या लिंकवर क्लिक केल्यावर ही सरकारी योजनाच असल्याचा भास होतो. याठिकाणी तुमचा वैयक्तिक तपशील, बँक खात्याची संपूर्ण माहिती घेण्यात येते आणि पुढे काय होते, हे वेगळं सांगायची गरज नाही.

सरकारची भूमिका काय

प्रधानमंत्री ज्ञानवीर नावाने सरकारची कोणतीच योजना नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही योजना फसवी आहे. सरकारकडून अशी आर्थिक मदत देण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणताही वैयक्तिक तपशील न देण्याचे आवाहन पीआयबीने फॅक्ट चेक अंतर्गत ट्विट केले आहे.

फिशिंग अटॅक

अशा प्रकारचा संदेश हा फिशिंग अटॅक आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर तुमची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरुन त्याआधारे तुमचे बँक खाते साफ केले जाते.

आयुष योजना पण बोगस

आयुष योजना नावानेही एक संदेश व्हायरल झाला आहे. या योजनेतंर्गत तुम्हाला 78856 रुपयांच्या वेतनाची नोकरी मिळाल्याचा संदेश पाठवण्यात येतो. लिंकवर क्लिक केल्यावर तुमची वैयक्तिक, शैक्षणिक आणि आर्थिक माहिती मागितली जाते. त्यानंतर फसवणूक करण्यात येते.