AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताय तर ‘या’ 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

आजकाल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची क्रेझ बरीच दिसून येते. या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीने प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच लूक येतो, आणि त्यामुळे लूकच्या सौंदर्यात भर पडते. अशावेळेस जर तुम्हालाही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचे शौक असेल, तर ते खरेदी करताना तुम्ही काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आपण जाणून घेऊयात...

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताय तर 'या' 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा
oxidized jewelleryImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 2:18 PM
Share

सध्या फॅशनच्या या जगात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड सध्या जोमात आहे. एवढंच नाही तर या ज्वेलरीला बाजारात प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कोणत्याही आउटफिटवर ही ज्वेलरी कॅरी करू शकता. त्यात प्रत्येक महिलेचा दागिना हा फॅशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. महिलांसोबत मुलीसुद्धा वेगवेगळ्या लुकसोबत वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालतात. जसे काही महिला सोन्याचे दागिने घालतात तर काही महिला त्यांच्या लुकनुसार आर्टिफिशियल ज्वेलरी घालतात. आता बाजारात अनेक प्रकारचे आर्टिफिशियल दागिनेही आले आहेत. जसे की एडी ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूपच सौंदर्यपूर्ण दिसते आणि प्रत्येक लूक खुलवण्यासाठी मदत करते. हेच कारण आहे की ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ही सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचे आवडते बनत आहे. पण तुम्हाला महित आहे का? या ज्वेलरींची फार काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही ते खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्यांने तुमचे नुकसान देखील होऊ शकते. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आपण या लेखात जाणून घेऊयात.

क्वॉलिटी चेक करणे

आता तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करायला गेलात तर तुम्हाला ती सहज प्रत्येक बाजारात मिळतील. पण ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना नेहमी त्याची गुणवत्ता तपासणे खूप महत्वाचे आहे. कारण जर ते निकृष्ट दर्जाचे असेल तर त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि ॲलर्जी होऊ शकते. म्हणून, जेव्हाही तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करता तेव्हा ते कोणत्या धातूचे बनलेले आहे ते तपासा.

वॉरंटी पण पाहा

शक्य असल्यास, फक्त ब्रँडेड दुकानातूनच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करा. कारण यामुळे तुम्हाला या ज्वेलरीची वॉरंटी किंवा गॅरंटी कार्ड देतील. जर भविष्यात दागिन्यांमुळे तुमच्या त्वचेला काही नुकसान झाले तर तुम्ही ती पुन्हा करून योग्य पद्धतीची ज्वेलरी पुन्हा खरेदी करू शकाल. आणि दुकानातून खरेदी केल्याने नुकसान देखील होणार नाही.

वजनाकडे लक्ष द्या

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना, त्यांच्या वजनाकडे नक्कीच लक्ष द्या. कारण स्वस्त आणि लोकल दागिने खूपच जड असतात. जर तुम्ही ते कोणत्याही ब्रँडचे विकत घेतले तर ते फक्त जड दिसेल आणि घालायला खूप हलके असेल. म्हणून, नेहमी चांगल्या दुकानातूनच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करा.

रंगाकडे लक्ष द्या

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा रंग सहसा गडद राखाडी असतो. पण जास्त काळ ठेवल्यास त्याचा रंग काळा होतो. अशावेळेस जेव्हा तुम्ही ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करता तेव्हा त्याचा रंग लक्षात ठेवा. जर दुकानदार तुम्हाला काळ्या रंगाचे दागिने देत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तो तुम्हाला जुने दागिने विकत आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत