
सध्या फॅशनच्या या जगात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड सध्या जोमात आहे. एवढंच नाही तर या ज्वेलरीला बाजारात प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कोणत्याही आउटफिटवर ही ज्वेलरी कॅरी करू शकता. त्यात प्रत्येक महिलेचा दागिना हा फॅशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. महिलांसोबत मुलीसुद्धा वेगवेगळ्या लुकसोबत वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालतात. जसे काही महिला सोन्याचे दागिने घालतात तर काही महिला त्यांच्या लुकनुसार आर्टिफिशियल ज्वेलरी घालतात. आता बाजारात अनेक प्रकारचे आर्टिफिशियल दागिनेही आले आहेत. जसे की एडी ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूपच सौंदर्यपूर्ण दिसते आणि प्रत्येक लूक खुलवण्यासाठी मदत करते. हेच कारण आहे की ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ही सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचे आवडते बनत आहे. पण तुम्हाला महित आहे का? या ज्वेलरींची फार काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही ते खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्यांने तुमचे नुकसान देखील होऊ शकते. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आपण या लेखात जाणून घेऊयात.
आता तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करायला गेलात तर तुम्हाला ती सहज प्रत्येक बाजारात मिळतील. पण ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना नेहमी त्याची गुणवत्ता तपासणे खूप महत्वाचे आहे. कारण जर ते निकृष्ट दर्जाचे असेल तर त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि ॲलर्जी होऊ शकते. म्हणून, जेव्हाही तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करता तेव्हा ते कोणत्या धातूचे बनलेले आहे ते तपासा.
शक्य असल्यास, फक्त ब्रँडेड दुकानातूनच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करा. कारण यामुळे तुम्हाला या ज्वेलरीची वॉरंटी किंवा गॅरंटी कार्ड देतील. जर भविष्यात दागिन्यांमुळे तुमच्या त्वचेला काही नुकसान झाले तर तुम्ही ती पुन्हा करून योग्य पद्धतीची ज्वेलरी पुन्हा खरेदी करू शकाल. आणि दुकानातून खरेदी केल्याने नुकसान देखील होणार नाही.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करताना, त्यांच्या वजनाकडे नक्कीच लक्ष द्या. कारण स्वस्त आणि लोकल दागिने खूपच जड असतात. जर तुम्ही ते कोणत्याही ब्रँडचे विकत घेतले तर ते फक्त जड दिसेल आणि घालायला खूप हलके असेल. म्हणून, नेहमी चांगल्या दुकानातूनच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करा.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा रंग सहसा गडद राखाडी असतो. पण जास्त काळ ठेवल्यास त्याचा रंग काळा होतो. अशावेळेस जेव्हा तुम्ही ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करता तेव्हा त्याचा रंग लक्षात ठेवा. जर दुकानदार तुम्हाला काळ्या रंगाचे दागिने देत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तो तुम्हाला जुने दागिने विकत आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)