सोनं घेताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! भाव कमी होण्याची दाट शक्यता

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 01, 2022 | 6:57 PM

तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

सोनं घेताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! भाव कमी होण्याची दाट शक्यता
Image Credit source: सोशल मीडिया

मुंबई : तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही. विशेष म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर 56 हजार रुपये प्रतितोळ्यांवर आला होता. तो तेव्हापासून आतापर्यंतचा सर्वाधिक दर मानला जातोय. ऑगस्ट 2020 नंतर सोन्याचे दर जे कमी झाले ते पुन्हा वरती आलेच नाहीत.

सोन्याच्या दरात घसरण होण्यामागे जागतिक मंदी हे प्रमुख कारण मानलं जातंय. विशेष म्हणजे जागतिक मंदीमुळे पुढच्या काही दिवसांतही पुन्हा सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलने दिलेल्या माहितीनुसार भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सोन्याच्या खपमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत एक चतुर्थांश घसरण येऊ शकते.

नुकतंच दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. त्याआधी दसरा, नवरात्रौत्सव, गणेशोत्सव होता. या सणाच्या काळात सोन्याच्या विक्रीत वाढ नक्कीच झाली. पण ज्या आकड्यांची आशा होती त्या आकड्यांपर्यंत यश मिळू शकलं नाही.

हे सुद्धा वाचा

सोन्याच्या किंमतीत घसरण होण्यामागचं मुख्य कारण हे महागाई आहे. विशेषत: ग्रामीण भागात सोन्याच्या मागणीत घट होऊ शकते. ग्रामीण भागातील अनेक नागरीक सणासुदीला दागिने खरेदी करतात.

भारत हा सोन्याची सर्वाधिक खरेदी करण्यात जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. पण भारतात सध्या सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरु शकतात.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरला (आज) सराफ बाजारात सोनं स्वस्त झालं आणि 50,460 रुपये प्रतितोळे अशा दरावर येऊन ठेपलं. विशेष म्हणजे हीच किंमत गेल्या महिन्याच्या सुरुवातीला 52 हजार इतकी होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI