Government Scheme : 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5 हजार ते 10 हजार रुपये सरकार देणार, जाणून घ्या संपुर्ण माहिती

या योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मार्ग आहेत अशा विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अकरावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Government Scheme : 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5 हजार ते 10 हजार रुपये सरकार देणार, जाणून घ्या संपुर्ण माहिती
Government Scheme
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 16, 2023 | 3:14 PM

मुंबई : शिक्षणाला गती देण्यासाठी सरकार 9वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) 5,000 ते 10,000 रुपये देत आहे. शिक्षणाचा प्रचारासाठी राज्य शासनाकडून (Government Scheme) आणि केंद्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचं अनुशंगाने दिल्ली सरकारनेही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष योजना आखली आहे. त्या योजनेचं नाव प्रतिभा योजना (Vidyarthi Pratibha Scheme) असं आहे.

दिल्लीतील सरकार या योजने अंतर्गत काही खास विद्यार्थ्यांना मदत करीत आहे. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची अर्थिक स्थिती योग्य नाही अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये 10वी, 11वी आणि 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा देखील होणार आहे.

या योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मार्ग आहेत अशा विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अकरावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा फक्त दिल्ली राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

या योजनेचा फायदा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांना याचा लाभ मिळेल तर सर्वसाधारण वर्गाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी गरजेच्या आहेत. मुला-मुलींकडे रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक तपशील, पासपोर्ट फोटो आणि मोबाईल क्रमांक असावा. edudel.nic.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी अर्ज भरु शकतात.