मोठी बातमी! शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 3 वाजता…

त्या पक्षाच्या कार्यकर्त्या कधीच नव्हत्या. त्यांचा आग्रह होता म्हणून प्रवेश दिला. पण तिकीटाची कमिटमेंट दिली नव्हती. त्या काही ज्येष्ठ नेत्या आहेत असं नाही. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता.

मोठी बातमी! शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 3 वाजता...
girish mahajanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 2:14 PM

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या कालपासून नॉट रिचेबल आहेत. शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पुरस्कृत केलं आहे. त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. काल मुंबईत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्या नाशिकला गेल्या. तेव्हापासूनच त्या नॉट रिचेबल आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा दीड तास बाकी असतानाच पाटील या नॉट रिचेबल झाल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या सर्व प्रकरणावर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. यात खळबळजनक काय मला माहीत नाही. माघारीला अवघे दोन तास बाकी आहेत. त्यामुळे उमेदवार कुठे जातो? कुठे राहतो? हा त्यांचा प्रश्न आहे. नॉट रिचेबल आहे आणि खळबळजनक बातमी आहे. पण यात खळबळजनक काहीच नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अर्ज कुणी मागे घ्यावा, कुणी ठेवावा याच्याशी आमचा काही संबंध नाही. आमचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी उभं राहावं, बसावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो 3 वाजेपर्यंत जाहीर होईल, असं महाजन यांनी सांगितलं.

अवघ्या 15 दिवसांपूर्वीच शुभांगी पाटील पक्षात आल्या. त्यांना तिकीटाची गॅरंटी दिली नव्हती. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करेल असं त्यांनी सांगितलं होतं. त्या वर्षभरापासून प्रवेश मागत होत्या. मलाही भेटल्या होत्या. जामनेरला आल्या होत्या. त्यामुळे त्यांना प्रवेश दिला.

त्या पक्षाच्या कार्यकर्त्या कधीच नव्हत्या. त्यांचा आग्रह होता म्हणून प्रवेश दिला. पण तिकीटाची कमिटमेंट दिली नव्हती. त्या काही ज्येष्ठ नेत्या आहेत असं नाही. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता. त्यांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राजा के बेटा राजा नही होगा, असं शुभांगी पाटील म्हणाल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी काय म्हणावं, काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्या काही फार मोठ्या नेत्या नाहीत. त्या राजकारणात पहिल्यांदा आल्या आहेत. त्या काय म्हणतात हा त्यांचा प्रश्न आहे.

त्यांना किती महत्त्व द्यावं हा प्रश्न आहे. कारण त्या पूर्वी राजकारणातच नव्हत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्याला आम्ही पाठिंबा देऊ ती सीट निवडून आणायची आहे. आणि आमचा उमेदवार विजयी होईल हे मात्र निश्चित आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.